Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: डोक्यात दगडी खलबत्ता घालून वृद्ध आजीचा खून, नातवाला अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

डोक्यात दगडी खलबत्ता घालून वृद्ध आजीचा खून, नातवाला अटक

Surajya Digital
Last updated: 2021/10/29 at 10:37 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन विकल्याच्या कारणावरून झोपेत असलेल्या वृद्ध आजीच्या डोक्‍यात दगडी खलबत्त्या घालून नातवाने  खून केला. ही घटना शहरातील दमाणी परिसरातील बॉबी चौकाजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली.

सीताबाई लक्ष्मण गायकवाड (वय ६५ रा.बुद्धविहार, बॉबी चौक) असे मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या प्रकरणात त्यांचा नातू लक्ष्मण चिदानंद गायकवाड (वय २९) याला पोलिसांनी अटक केली. त्याला ३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज गुरुवारी दिला .

मयत सीताबाई गायकवाड यांची शेतजमीन कोरसेगाव (ता.अक्कलकोट) येथे होती. ती जमीन वडिलांच्या नावावर होती. आणि आजी ने परस्पर विकल्याचा राग लक्ष्मणला होता. त्या कासावरून   त्यांच्यात नेहमी तक्रारी होत होते. काल रात्री सीताबाई गायकवाड या घरात झोपल्या होत्या. पहाटे दोन वाजेच्या सुमारास लक्ष्मण गायकवाड याने त्यांच्या डोक्यात दगडी खलबत्ता टाकला. त्यांना अवस्थेत पोलिसांनी  शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्या उपचारापूर्वी मयत झाल्या. या घटनेची फिर्याद पोलीस शिपाई फिरोज तांबोळी यांनी फौजदार चावडी पोलिसात दाखल केली. त्याप्रमाणे पोलीसांनी लक्ष्मण गायकवाड याला खुनाच्या आरोपाखाली अटक करून पोलीस कोठडी घेतली. अटकेतील लक्ष्मण गायकवाड हा अविवाहित असून तो हॉटेलात वेटरचे काम करीत होता. असे पोलिसांकडून सांगण्यात आले. फौजदार भोईटे पुढील तपास करीत आहेत.

* किरकोळ भांडणातून काठीने सासूचे
डोके फोडले : सुनेवर  गुन्हा दाखल

मंगळवेढा – पाणी भरण्याच्या किरकोळ भांडणातून सुनेने काठीने बदडून सासूचे डोके फोडले. ही घटना चिक्कलगी (ता.मंगळवेढा) येथे बुधवारी सकाळच्या सुमारास घडली.

गौराक्का संगप्‍पा बिराजदार (वय५५ रा. चिक्कलगी) असे जखमी सासूचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मीनाक्षी सिद्धण्णा बिराजदार या सुने विरुद्ध मंगळवेढ्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बुधवारी सकाळच्या सुमारास गौराक्का यांचा नातू हौदात पाणी भरत होता. त्यावेळी त्यांनी हौदात पाणी जादा सोडू नको असे सांगितले. ह तेव्हा सुनेने सासूला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. शिवीगाळ करू नको, असे म्हणताच सुनेने काठीने त्यांच्या डोक्यात मारहाण करून जखमी केले. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार येलपले पुढील तपास करीत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* महिलेस मारहाण : दिरावर गुन्हा

डोणज (ता.मंगळवेढा) येथील बिरोबा मंदिराजवळ माझ्यासोबत नेहमी भांडण करते या कारणावरून काठीने केलेल्या मारहाणीत भागीरथी धोंडप्पा पूजारी (वय ५०) ही महिला जखमी झाली. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. जखमीने दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा चुलत दीर देवप्पा भारत पुजारी याच्याविरुद्ध मंगळवेढ्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हवालदार दुधाळ पुढील तपास करीत आहे .

* व्यापारी असल्याचे सांगून दिवसा घरातील दागिने पळविले

सांगोला – आम्ही डाळिंबाचे व्यापारी आहोत, तुमची बाग पहायची आहे. तुमच्या सासूला बोलवा अशी थाप मारून दोघा चोरट्यांनी महिलेच्या घरातील रोख रकमेसह ६७ हजाराचे दागिने पळविले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास वझरे (ता.सांगोला) येथे घडली.

सोनाली अनिल गायकवाड (रा.वझरे) या मंगळवारी दुपारी शेतातील वस्तीवर काम करीत होत्या. त्यावेळी दोघा अनोळखी इसमांनी त्यांच्या घराजवळ येऊन आम्ही व्यापारी आहोत, तुमची डाळिंबाची बाग पहायची आहे असे सांगितले. त्या सासूला बोलण्यासाठी शेतात गेल्या होत्या. तेव्हा दोघांनी उघड्या घरात प्रवेश करून बेडरुमच्या गादीखाली ठेवलेले ११ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३० हजाराची रोकड घेऊन पोबारा केला. हा प्रकार घडल्यानंतर सोनाली गायकवाड यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दाखल केली. हवालदार इरकर पुढील तपास करीत आहेत .

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Murder #grandmother #stone #slab #head #grandson #arrested, #डोक्यात #दगडी #खलबत्ता #वृद्ध #आजी #खून #नातवाला #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुणे विमानतळ उद्यापासून पुन्हा सुरु, रात्रीच्या प्रवासासाठी पहावी लागणार आणखी वाट
Next Article आंदोलन मागे घेतले असतानाच एसटीलाच गळफास लावून चालकाची आत्महत्या

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?