Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आंदोलन मागे घेतले असतानाच एसटीलाच गळफास लावून चालकाची आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

आंदोलन मागे घेतले असतानाच एसटीलाच गळफास लावून चालकाची आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2021/10/29 at 11:11 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

अहमदनगर :  वेतनासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी बेमुदत आंदोलन पुकारले होते. काल राज्य सरकारने अटी मान्य केल्याने आंदोलन मागे घेतले. अशातच आज शुक्रवारी सकाळी परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेनंतर एसटी महामंडळ आणि कर्मचा-यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे (वय 56) असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते चालक म्हणून येथील आगारात कार्यरत होते. डेपोत उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

आंदोलन मागे घेतलेले असतानाच आज शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे या एसटी कर्मचाऱ्याने एसटीच्या मागील बाजूस असलेल्या शीडीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

काकडे हे महाराष्ट एसटी कामगार संघटनेचे सदस्य असल्याचे कळते.त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल अधिक माहिती भेटली नाही. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या जवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नसल्याची माहिती आहे.

सुरू असलेलं एसटी बंद आंदोलन हे मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर आज शुक्रवारी लगेच शेवगाव आगारात दिलीप हरिभाऊ काकडे यांनी केलेल्या आत्महत्येमुळे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

घटनेची माहिती मिळताच आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत,आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना समजताच मोठी खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* अखेर राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे

– आज दिवसभर एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारला होता, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. त्यातच आता कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार महागाई भत्ता 12 टक्क्यांवरून 28 टक्के केला आहे. तसेच घरभाडे भत्ता 2 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. त्यानंतर हा बंद कर्मचाऱ्यांनी मागे घेतला.

गेले अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अखेरीस सरकारनं मानल्या आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे.

एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 वरून 28 टक्क्यांवर वाढवण्यात आलाय तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली आहे. आज मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलंय

प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचारी कालपासून उपोषणास बसले आहेत मात्र काल यावर तोडगा न निघाल्याने अखेर आजपासून कामावर न जाण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही एसटी बाहेर काढणार नाही या निर्णयावर एसटी कर्मचारी ठाम होते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #agitation #withdrawn #driver #committed #suicide #hanging #ST, #आंदोलन #मागे #एसटी #गळफास #चालक #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article डोक्यात दगडी खलबत्ता घालून वृद्ध आजीचा खून, नातवाला अटक
Next Article अमित शाह यांचं ठरलंय? 100 आमदारांचे तिकीट कापण्याची तयारी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?