Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सानिया मिर्झाने पाकिस्तानच्या टीमसोबत साजरा केला मुलाचा बर्थडे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

सानिया मिर्झाने पाकिस्तानच्या टीमसोबत साजरा केला मुलाचा बर्थडे

Surajya Digital
Last updated: 2021/10/31 at 9:03 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने तिचा मुलगा इझान मिर्झा मलिकचा वाढदिवस पाकिस्तान क्रिकेट टीमसोबत साजरा केला. सानियाने इन्स्टाग्रामवर तिच्या मुलाच्या वाढदिवसाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा. तीन वर्षांपूर्वी या दिवशी मी तुझी आई म्हणून पुनर्जन्म घेतला मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आम्हाला पालक म्हणून निवडल्याबद्दल धन्यवाद’ अशा आशयाचे कॅप्शन तिने फोटोला दिले आहे.

पाकिस्तान संघाचा टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतचा प्रवास अतिशय नेत्रदीपक ठरला आहे, त्यांनी तिन्ही सामने जिंकत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे संपूर्ण संघात आनंदाचे वातावरण आहे. अशातच सानिया मिर्झाने हे कृत्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सानिया मिर्झाने इझानच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट लिहिली, “माझ्या संपूर्ण जगाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तीन वर्षांपूर्वी या दिवशी मी तुझी आई म्हणून पुनर्जन्म घेतला. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आम्हाला पालक म्हणून निवडल्याबद्दल धन्यवाद”, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा क्रीडाविश्वातील पॉवर कपल म्हणून ओळखले जाते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शोएब आणि सानिया दोघांचा एक चाहता वर्ग आहे. शोएब आणि सानियाने मुलगा इझान मिर्झा मलिकचा तिसरा वाढदिवस पाकिस्तान क्रिकेट संघ आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत साजरा केला. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेदरम्यान पती शोएब मलिकसोबत भारताची सानिया मिर्झा पाकिस्तान क्रिकेट संघाच्या बायो बबलमध्ये आहे.

सानियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या मुलाच्या वाढदिवसाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री तथा विराटची पत्नी अनुष्का शर्मानेही इझानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पाकिस्तानचा अनुभवी क्रिकेटपटू मोहम्मद हाफीज आणि त्याच्या पत्नीने इझानचा वाढदिवस साजरा केला.

You Might Also Like

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

TAGGED: #SaniaMirza #celebrates #son's #Birthday #Pakistan #team, #सानियामिर्झा #पाकिस्तान #टीमसोबत #साजरा #मुलाचा #बर्थडे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बिनबुडाचे, खोटे आरोप; नवाब मलिकांविरोधात 100 कोटींचा खटला
Next Article कार्तिकी यात्रेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सज्ज, जिल्हाधिका-यांना पाठविला प्रस्ताव

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?