Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गुजरातमधील कोविड रुग्णालयास भीषण आग; आठजणांचा होरपळून मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

गुजरातमधील कोविड रुग्णालयास भीषण आग; आठजणांचा होरपळून मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/08/06 at 10:39 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अहमदाबाद : कोरोनाचे संकट असतानाच आणखी एक भीषण दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. कोरोनाग्रस्त रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत 8 कोरोनाग्रस्तांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. आगीनं रौद्र रुप धारण केल्यानं रुग्णालयात मोठी खळबळ उडाली.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, अहमदाबादमधील श्रेय हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेने आपण दु:खी झालो असून मृतकांच्या परिवाराप्रती संवेदना.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मिळालेल्या माहितीनुसार गुजरातच्या अहमदाबाद इथे नवरंगपुरा परिसरातील श्रेय रुग्णालयात भीषण आग लागली. आगीची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी तातडीनं पावलं उचललं मात्र तोपर्यंत आगीनं रौद्र रुप धारण केलं होतं. त्यामुळे या आगीत होरपळून आयसीयूमधील 8 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या रुग्णालयात अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ICUमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या 8 रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. आगीत होरपळून मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून उरलेल्या 35 कोरोना रुग्णांना तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रात्री 2.30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेसंदर्भात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि अहमदाबादचे महापौर बिजल पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. प्रशासनाकडून घटनेतील लोकांना मदत केली जात आहे.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #कोविडरुग्णालय #अहमदाबाद #श्रेयहॉस्पिटल #होरपळून #आठमृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाणीपातळी वाढली; गावातील ग्रामस्थांनी सतर्क रहावे, नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा
Next Article तीन महिन्यापासून स्थानिक वित्त विभाग पाहणारे सहायक संचालक पांडे यांची महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?