Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आज आणि उद्या पाऊस झोडपणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

आज आणि उद्या पाऊस झोडपणार

Surajya Digital
Last updated: 2021/11/06 at 7:45 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : हवामान खात्याने आज (शनिवारी) पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. रविवारी राज्यात सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयातच पावसाचा इशारा देण्यात आला. याव्यतिरिक्त रविवारी पुणे, रायगड, सांगली, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई कार्यालयाने पुढील चार दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज आज शुक’वारी जारी केला. अरबी समुद्रातील हवामानाच्या स्थितीमुळे पुढील दोन तीन दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पुढील तीन दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर रविवारीपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

Thunderstorm accompanied with lightning, gusty winds & moderate to intense spells of rain very likely at isolated places in the districts of Thane, Raigad, Nasik, Ahmednagar, Pune, Satara, Ratnagiri, Sindudurg and Kolhapur during next 3-4 hours. pic.twitter.com/gWI632mCP6

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 5, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आज पुण्यासह एकूण १२ जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी पुढील काही तासांत विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नगिरी, सिंधुदुर्ग, रायगड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि अहमदनगर या बारा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिक,आणि नांदेड या जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. शनिवारी राज्यात पावसाचा जोर मंदावणार असून कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. शनिवारी पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 5) सकाळी  अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, ढगांचा जोरदार गडगडाट सुरू होता. सलग तिसर्‍या दिवशी अवकाळी पावसामुळे ऐन दिवाळीत नागरिकांची तारांबळ उडाली. भात शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गेले तीन दिवस अचानक पडत असलेल्या पावसामुळे कापणी करून वाळत घातलेल्या भात पिकाचे शेतात पाणी साचल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #rain #today #tomorrow, #आज #उद्या #पाऊस #झोडपणार #महाराष्ट्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अचानक फटाका फुटला अन् अभिनेत्री थोडक्यात बचावली
Next Article टी-20 वर्ल्ड कप – भारताच्या रनरेटमध्ये मोठी वाढ, पण सेहवाग म्हणतो इंग्लंड ‘वर्ल्डकप’ जिंकणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?