मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातील आंबा दाखल झाला आहे. हापूससारखी चव, रंग व आकार असलेला हा आंबा 1200 ते 1500 रुपये किलो दराने विकला जात आहे.
मलावी या देशात कोकणा सारखे वातावरण आहे. या भागातील शेतकऱ्यांनी 2011 मध्ये हापूस आंब्याची रोपे भारतातून घेऊन गेले होते. तेथे त्यांनी 400 एकरमध्ये आंबा लागवड केली. यामध्ये एक एकरमध्ये 400 रोपांची लागवड करण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये हा आंबा तयार होत असून तो भारतासह इतर देशात विक्रीसाठी पाठविला जातो. कोकणातील हापूसची चव या आंब्याला असल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणत पसंती मिळत आहे.
दरवर्षी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरदरम्यान मलावी येथील हापूस मुंबई एपीएमसीत मागवला जातो. गेल्या तीन वर्षांत 35 हजार पेट्या मुंबईत विक्री झाल्या. मलावी हापूस ही जात तशी कोकणातील हापूसची. या आंब्याची चवदेखील कोकण हापूस सारखी असून रंग, आकारही मिळताजुळता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
230 बॉक्स मुंबई बाजार समितीमध्ये आले आहेत. 3 किलो वजनाचा 1 बॉक्स असून, त्यामध्ये 9 ते 12 आंबे बसतात. मुंबईमध्ये 15 डिसेंबरपर्यंत या आंब्याचा हंगाम सुरू राहणार असल्याने येत्या पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक वाढू शकते.
दक्षिण पूर्व आफ्रिकेत मलावी देशातील आंबा काही वर्षांपासून भारतात विक्रीसाठी येत आहे. हापूससारखी चव, रंग व आकार असलेला हा आंबा दिवाळीच्या दरम्यान मार्केटमध्ये येत असल्यामुळे ग्राहकांकडून त्याला पसंती मिळते. हा आंबा मुंबई बाजारात दाखल झाला आहे. यामध्ये 3 किलो वजनाचा एक बॉक्स असून, त्यामध्ये 9 ते 12 आंबेच बसतात. आणि या एका पेटीची किंमत 3600 ते 4500 इतकी आहे.
याचा दर वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांना जादा दराने हा आंबा विकत घ्यावा लागणार आहे. याला होलसेल मार्केटमध्ये 1200 ते 1500 रुपये प्रतिकिलो असा दर मिळत आहे. मुंबईमध्ये 15 डिसेंबरपर्यंत या आंब्याचा हंगाम सुरू राहणार असून पुढील एक महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे.