Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर, लॉकडाऊनचा विचार करा : सुप्रीम कोर्ट;
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर, लॉकडाऊनचा विचार करा : सुप्रीम कोर्ट;

Surajya Digital
Last updated: 2021/11/13 at 8:17 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

नवी दिल्ली : दिल्लीत प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एनवी रमन्ना यांनी चिंता व्यक्त केली आणि सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. वायू प्रदुषाच्या निमित्ताने सुरू एका याचिकेवर मत मांडताना न्यायालयाने हा सल्ला देऊ केला आहे.

प्रदूषणाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दिल्ली – एनसीआरमध्ये तातडीने दोन दिवस लॉकडाऊन करण्यासंबंधी विचारा करावा, असा सल्ला रमन्ना यांनी दिला आहे. प्रदूषणामुळे घरांमध्ये लोकांना मास्क घालून राहावं लागत आहेत, असेही रमन्ना यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील वाढत्या वायू प्रदुषणाची दखल घेतानाच केंद्र सरकार तसेच दिल्ली सरकारला काही सूचना देऊ केल्या आहेत. वायू प्रदुषणाची वाढती पातळी पाहता देशाच्या राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये दोन दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात यावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही सरकारला केली आहे.

दिल्लीतील वायु प्रदुषणाच्या आकडेवारीमुळे गेल्या काही दिवसांपासून अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रदूषणाच्या निमित्तानेच एका याचिकेवर बोलताना न्यायालयाने सल्ला देऊ केला आहे.

सरन्यायाधीस एन व्ही रमण, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि सुर्यकांत यांनी दिल्लीतील वायू प्रदुषणाची पातळी ही धोक्याच्या श्रेणीत असल्याचे मत नोंदवले आहे. तसेच ही पातळी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आणखी खालावणार असल्याचे मतही न्यायालयाकडून मांडण्यात आले आहे. त्यामुळेच केंद्राने या गंभीर परिस्थितीवर तातडीने कारवाई करावी, अशीही सूचना न्यायालयाकडून केली आहे.

सध्याची एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ही ५०० हून २०० पॉईंट्सवर कशी कमी करता येईल याबाबत स्पष्टीकरण द्या, असे मत न्यायालयाने मांडले आहे. तुम्हाला दोन दिवसांचा लॉकडाऊनचा विचार करता येईल का ? असाही प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. पण त्याचवेळी लोक जगणार कसे असाही सवाल न्यायालयाने केला. देशातील राजधानीत दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

वायू प्रदुषणात कपात करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता खरच सुधारायची असेल तर राजकारण आणि सरकार या दोन्ही गोष्टींकडे जाऊन हा विषय हाताळायला हवा, असेही मत न्यायालयाने यावेळी मांडले. काहीतरी महत्वपूर्ण पाऊले उचलली जाण्याची गरज आहे, ज्यामुळेच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. केंद्र सरकारला न्यायालयाच्या खंडपिठाने या सुनावणीनंतर काही सूचनाही केल्या.

* केंद्र सरकारकडून अजब बाजू

केंद्र सरकारकडून बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीने सांगितले की, सरकारकडून एक आपत्कानी बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामध्ये तत्काळ उपाययोजनांसाठी काय करता येईल ही बाब चर्चेला येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येत्या १८ नोव्हेंबरपर्यंत आम्ही परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. कारण भारतीय प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केल्यानुसार तण जाळल्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच हवेची गुणवत्ता ढासळण्यासाठी तेदेखील एक कारण असल्याचे आयएमडीने सांगितले आहे.

पण न्यायालयाने या युक्तिवादावर म्हटले की, वाढत्या प्रदूषणासाठी फक्त शेतकऱ्यांना दोषी ठरवता येणार नाही. त्यामुळेच नुसत्या तण जाळण्याचे एक कारण वायू प्रदुषणासाठी जबाबदार न ठरवता आणखी इतर कारणेही शोधण्याची गरज असल्याचे मत न्यायालयाने मांडले आहे. त्यामुळे वाहनांमुळे होणारे प्रदुषण आणि औद्योगिक प्रदुषण यासारखे मुद्देही ग्राह्य धरायला हवेत असे मत न्यायालयाने यावेळी मांडले.

* पुढील सुनावणी येत्या सोमवारी

न्यायालयाने याच सुनावणीदरम्यान विचारले की दिल्ली सरकारच्या स्मॉग टॉवर लावण्याच्या पुढाकारावर नक्की काय झाले ? असाही सवाल केला. तसेच एमिशन कंट्रोल प्रोजेक्टसाठी नक्की काय केले अशीही विचारणा न्यायालयाकडून करण्यात आली. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील हा विषय नसून राज्य सरकारच्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे यासाठी नेमका काय पुढाकार दिल्ली सरकारने घेतला असा प्रश्न न्यायालयाने यावेळी विचारला. या प्रकरणातील सर्व संबंधितांना घेऊन आपत्कालीन बैठक आयोजित करा असेही न्यायालयाने यावेळी सांगितले. तसेच या प्रकरणावरील पुढील सुनावणी येत्या सोमवारी ठेवण्यात आली आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Pollution #situation #critical #Consider #lockdown #SupremeCourt, #प्रदूषण #परिस्थिती #गंभीर #लॉकडाऊन #विचारकरा #सुप्रीमकोर्ट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भीषण अपघातात तरुण नगरसेवकाचा जागीच मृत्यू
Next Article ‘जय भीम’ सर्वोच्च स्थानी, आयएमडीबीच्या यादीत 9.6 रेटिंग

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?