Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारताच्या फाळणीसाठी काँग्रेस जबाबदार – ओवेसी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

भारताच्या फाळणीसाठी काँग्रेस जबाबदार – ओवेसी

Surajya Digital
Last updated: 2021/11/13 at 10:07 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लखनौ : एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भारताच्या फाळणीसाठी मुस्लिम जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. जिन्ना आणि काँग्रेसचे मोठे नेते भारताच्या फाळणीसाठी जबाबदार आहेत, असा आरोप एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला.

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांच्या सभेने जोर धरला आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे सभा घेत मोठे विधान केले. त्यातच असदुद्दीन ओवेसी यांनी फाळणीबद्दल केलेलं एक विधान चर्चेत आहे.यावेळी त्यांनी मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या पुस्तकाचा दाखला दिला. काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना फाळणी हवी होती, असा उल्लेख आजाद यांच्या पुस्तकात असल्याचे ओवेसी यांनी म्हटले.

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख  ओपी राजभर यांनी मोहम्मद अली जिना यांना हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान केले असते तर फाळणी झालीच नसती, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाच्या एका दिवसानंतर एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी काँग्रेस आणि त्या वेळचे नेतेच फाळणीला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुरादाबादमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना ओवैसी यांनी फाळणीला मुस्लीम नाही तर, मोहम्मद अली जिना आणि काँग्रेस नेतेच जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत, ते म्हणाले की संघ आणि भाजपशी संबंधित लोक नीट वाचन करत नाहीत आणि फाळणीसाठी मुस्लिमांना दोष देतात.

पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, त्यावेळी नवाब किंवा पदवीधारकांसारख्या प्रभावशाली मुस्लिमांनाच मतदान करण्याची मुभा होती. भारताच्या फाळणीला काँग्रेस आणि त्या काळातील त्यांचे नेते जबाबदार होते, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, युपी पोलिसांवरही ओवेसींनी टीका केली. कासगंज घटनेत तरुणाच्या मृत्यूबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांवर ओवेसी यांनी टीका केली. ‘कासगंजची घटना तुमच्यासमोर आहे. अल्ताफच्या वडिलांना सांगण्यात आले की, त्यांच्या मुलाने हुडीच्या तारेने अडीच फूट उंच पाण्याच्या नळाला गळफास लावून आत्महत्या केली, परंतु कासगंज पोलिसांनीच त्या युवकाला ठार मारले आहे. यूपी पोलिसांना तपास करणे माहीत नाही तर खून करणे माहीत असल्याचा आरोप केला.

You Might Also Like

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा

अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

TAGGED: #Congress #responsible #partition #India #Owaisi, #भारत #फाळणी #काँग्रेस #जबाबदार #ओवेसी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘जय भीम’ सर्वोच्च स्थानी, आयएमडीबीच्या यादीत 9.6 रेटिंग
Next Article कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला संघाचा पाकिस्तानशी सामना

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?