Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘त्या’एसटी कर्मचा-याची प्रकृती खालावली, भाजप जिल्हाध्यक्षाची विभाग नियंत्रकाला दमबाजी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

‘त्या’एसटी कर्मचा-याची प्रकृती खालावली, भाजप जिल्हाध्यक्षाची विभाग नियंत्रकाला दमबाजी

Surajya Digital
Last updated: 2021/11/14 at 9:52 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : आपल्या विविध मागण्यांसाठी चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन केलेल्या सोलापुरातील एसटी कर्मचाऱ्याची प्रकृती काल खालावली. शनिवारी (ता. 13 ) त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले.

मनोज मुदलियार असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. तरीही त्यांनी अन्नत्याग आंदोलन सोडण्यास नकार दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हे आंदोलन चालू आहे.

यात सोलापुरातही एसटी कर्मचारी मनोज मुदलियार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. चार दिवसापासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली असून एसटीचे वरिष्ठ आधिकारी अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांची समजूत काढत आहेत. मात्र मुदलियार आपल्या मागण्यांवर ठाम असून अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले.

मुदलीयार यांच्यासोबत एसटीचे अनेक कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वाहतूक नियंत्रक विलास राठोड, आगार व्यवस्थापक कुलकर्णी यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र मुदलियार हे ऐकणास तयार नसल्याचं सांगितले जात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* भाजप जिल्हाध्यक्षाची विभाग नियंत्रकाला दमबाजी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करून कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन करूनही कर्मचारी मागणीवर ठाम आहेत.

दरम्यान, शुक्रवारी (ता. 12) भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सहाजणांनी सोलापूरच्या विभाग नियंत्रकांना संपात का सहभागी होत नाहीत, म्हणून दमदाटी केली. तर कर्मचाऱ्यांवरील निलंबन मागे घ्या, त्यांना कामावर जाण्याची सक्‍ती करू नका, असे म्हणून त्यांना कार्यालयातून बाहेर जाण्यास अडथळा आणल्याप्रकरणी विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी त्यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर आगारातील परिवहन कर्मचारी हे आगारासमोरच आंदोलनासाठी बसले आहेत. शुक्रवारी (ता. 12) दुपारी तीनच्या सुमारास भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, गणेश भोसले, नितीन करजोळे, गीता पाटोळे, धनश्री खटके, सविता कस्तुरे यांनी सोलापूर विभागाच्या आगार नियंत्रकाच्या कार्यालयात धाव घेतली. मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता त्यांनी कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी, तुम्ही कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी का होत नाही, असा जाब विचारला आणि देशमुख यांनी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घ्या, अन्यथा तुम्ही काम कसे करता हे बघून घेतो, अशी दमदाटी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Health #STemployee #deteriorated #BJP #districtpresident's #arrogant #departmentcontroller, #एसटी #कर्मचा-याची #प्रकृती #खालावली #भाजप #जिल्हाध्यक्ष #विभागनियंत्रक #दमबाजी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला संघाचा पाकिस्तानशी सामना
Next Article मुंबईत खळबळ उडवणारा ‘तो’ कॉल दुबईतून

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?