नवी दिल्ली : टी-20 वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाने जिंकला. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला. त्याने पूर्ण स्पर्धेत एकूण 289 धावा केल्या. मात्र पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने यावर नाराजी व्यक्त केली आहे. संतापही व्यक्त केलाय. शोएब अख्तर प्रत्येक सामन्यानंतर कोणत्या ना कोणत्या प्रतिक्रिया देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
हा निर्णय अयोग्य आहे, या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या बाबरला हा पुरस्कार मिळायला हवा होता, असे शोएबने म्हटले आहे. बाबरने एकूण 303 धावा केल्या आहेत.
काल रविवारी टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झाला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला. परंतु या विजयानंतर आरोप होऊ लागले आहेत. शोएब अख्तरने अंतिम सामन्यानंतर आरोप केला पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमबरोबर या टुर्नामेंटमध्ये अन्याय झाला असल्याचा आरोप केला.
दुबईत झालेल्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला कप मिळवून देण्याचं काम मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नरने केलं. मार्शने नाबाद राहत 77 धावांची खेळी केली. तर सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 38 चेंडूंमध्ये 53 धावा करत विजयाचा पाया रचला. मार्शच्या धमाकेदार खेळीमुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. तर संपूर्ण विश्वचषकात शानदार फलंदाजी करण्यासाठी डेव्हिड वॉर्नरला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आलं. वॉर्नरला हा पुरस्कार देणं योग्य नसल्याचं शोएब अख्तरने सामन्यानंतर म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’ वरही उपलब्ध
फायनलनंतर जेव्हा डेव्हिड वॉर्नरला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार देण्यात आला. यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएबने नाराज होऊन आपला संताप व्यक्त केलाय. त्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.
डेव्हिड वॉर्नरला नाही तर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सलामीवीर बाबर आझम याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळायला हवा होता, असे शोएब अख्तरचे मत आहे. त्याच्यावर अन्याय होत असल्याचा आरोपही अख्तरने केला आहे. अंतिम फेरीनंतर सादरीकरण समारंभात डेव्हिड वॉर्नरला पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा शोएब अख्तरने लगेचच ट्विट केले आणि लिहिले, “बाबर आझमला ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून घोषित केले जाईल याची मला उत्सुकता होती. अत्यंत अन्यायकारक निर्णय असल्याचे म्हटले.
* हास्यास्पद ट्विट
पुरस्कारावरुन शोएबने केलेलं ट्विट हे हास्यास्पद आहे,, कारण अनेक जागतिक दर्जाच्या दिग्गजांच्या ज्युरी पॅनेलने या पुरस्कारांसाठी खेळाडूंची निवड केली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अर्थातच बाबर आझमने 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 303 धावा केल्या, पण दुसऱ्या क्रमांकावर असलेला डेव्हिड वॉर्नरने 289 धावा केल्या आहेत.
Was really looking forward to see @babarazam258 becoming Man of the Tournament. Unfair decision for sure.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 14, 2021
बाबरपेक्षा तो 14 धावांनी मागे होता. पण वॉर्नरने वेस्ट इंडिज (नाबाद 89), पाकिस्तान (49) आणि न्यूझीलंड (53) यांच्याविरुद्धच्या शेवटच्या तीन मोठ्या सामन्यांमध्ये सलग तीन शानदार खेळी खेळली कारण त्याचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला, त्यानंतर अंतिम फेरीत पोहोचला आणि त्यानंतर विजेतेपद पटकावले. त्यामुळेच तो हक्कदार असल्याचे क्रिकेट रसिकामधून प्रतिक्रिया येत आहेत.