सोलापूर/ अक्कलकोट : सोलापूर – अक्कलकोट रोडवरील कुंभारी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचा आज मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. यात पाचजण जागीच ठार तर एकाच प्रकृती चिंताजनक तर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. एसटीचा संप असल्याने खासगी वाहनातून प्रवासी कोंबून भरुन नेण्याच्या प्रकारामुळे हा प्रकार घडला आहे.
एका प्रवाशाची ओळख पटली नाही. दरम्यान या अपघातात गंभीर जखमी असलेल्या एका जखमीचा उपचारादरम्यान दुपारी चारच्या सुमारास अश्विनी रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच त्या पाचव्या मृत अनोळखी महिलाचीही ओळख पटली असून सुनीता सुनील महाडकर (वय ४० रा. दोड्याळ ता. अक्कलकोट) असे नाव आहे.
आनंद युवराज लोणारी (वय २८, रा. अक्कलकोट शहर) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव असून आनंद हा अक्कलकोट मधील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक असल्याचीही माहिती पुढे येत आहे. मयत आनंद लोणारी यांचा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याचे वृत्त आहे. लोणारी हे आमदार कल्याणशेट्टी यांच्या मुलांना घरी येऊन ट्युशन देत होते, आज मंगळवारी एसटी नसल्याने लोणारी हे सुद्धा प्रवासी जीपने सोलापूरकडे येत होते, या अपघातात गंभीर जखमी झाल्याने सिव्हिल हॉस्पिटल मधून त्यांना अश्विनी रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान या शिक्षकाचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे संपूर्ण अक्कलकोट तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यातील सर्व मयत हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ६ जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुवे संप लवकर मिटावा, अशी अपेक्षा करीत या संपात सत्ताधा-यांसह विरोधी पक्षालाही अपयश आले आहे. त्यामुळे कार्तिकीवारीपासून कित्येक वारक-यांना मुकावे लागले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुरुवातिला ठार झालेल्या पैकी ३ पुरुष व २ महिलांच्या समावेश असून, ठार झालेल्या पैकी अक्कलकोट तालुक्यातील बागेहळ्ळीचे ३ जणांचा समावेश असून, यात कटेव्वा यलप्पा बनसोडे (वय-५५,रा.बागेहळ्ळी), त्यांचा मुलगा बसवराज यलप्पा बनसोडे ( वय- ४२, रा.बागेहळ्ळी),व कटेव्वाचे भाऊचा मुलगा आनंद इरप्पा गायकवाड ( वय- २५, रा.बागेहळ्ळी) व लक्ष्मण मुरलीधर शिंदे ( वय- ४२,रा. बणजगोळ, ता.अक्कलकोट ) व सुनीता सुनील महाडकर (वय ४० रा. दोड्याळ ता. अक्कलकोट) असे मृताचे नावे आहेत.
अंदाजे वय- ३५ असे एकूण पाच जणांचा समावेश आहे. जागीच ठार झालेल्या जवळपास ३० वयाच्या पुढील असल्याचे वृत्त आहे.
अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या (MH-१३ AX-१२३७ ) जीपचे पुढील टायर फुटल्याने सोलापूर – अक्कलकोट रोडवर पंपासमोर गाडी पलटी झाली. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर, अक्कलकोट व गाणगापूर असा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश आहे. अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन सोलापूरकडे जात असताना हा अपघात झाला.
एकूण १२ प्रवाशांपैकी सहा जण किरकोळ जखमी, एकाच प्रकृती चिंताजनक व पाच जणांचा जागीच मृत्यू झाले आहेत. सध्या एसटी बस बंद असल्याने नागरीक मिळेल त्या वाहनांनी प्रवास करत आहेत. त्यामुळे खासगी तसेच अवैध प्रवासी वाहतूक वाढली आहे. एका वाहनात बारा प्रवासी कोंबले. त्यामुळेच वाहनाचे टायर फुटून हा अपघात झाला आहे. एसटीचा संप १९ दिवस होऊनही मिटत नसल्याने नागरिकांनाही असा धोक्याचा प्रवास करावा लागत आहे. जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या जखमीतील एकाने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक माहिती दिली, त्या जखमींने गाडीत २५ प्रवासी होते. तसेच आपणास टायर फुटल्याचा आवाजच आला नाही. तर चालक हा मोबाईलवर बोलत होता. समोर खड्डा दिसला नाही. त्यात गेल्याने जीपगाडी पलटी झाल्याचे सांगितले.