सोलापूर : सोलापूर शहरात गुरुवारी आलेल्या अहवालात कोरोनाचे 52 रुग्ण आढळून आले आहेत. आज सुदैवाने एक मृत्यू नाही. मात्र कोरोनावर तब्बल 106 जणांनी मात केली आहे. त्यामध्ये 59 पुरूष आणि 29 महिला रूग्णांचा समावेश आहे.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 5 हजार 291 संख्या झाली असून त्यामध्ये पुरुष 3 हजार 77 तर 2 हजार 214 महिला रुग्णांचा समावेश आहे. आज एक बळी नाही मात्र आतापर्यंत शहरांमध्ये 369 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 244 तर महिला 125 रुग्णांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुरुवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 541 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 489 अहवाल निगेटिव्ह तर 52 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 37 हजार 895 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 32 हजार 334 तर 5 हजार 291 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 381 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 3 हजार 541 आहे.