Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कुंभारी अपघात : जीप मालकास अटक, चालकास न्यायालयीन कोठडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

कुंभारी अपघात : जीप मालकास अटक, चालकास न्यायालयीन कोठडी

Surajya Digital
Last updated: 2021/11/17 at 10:28 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

अक्कलकोट : अक्कलकोटहून सोलापूरला येणाऱ्या प्रवासी जीपचे टायर फुटून कुंभारीजवळ झालेल्या भीषण अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकास अटक झाली. आज त्यास अक्कलकोट न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली. तसेच जीपच्या मालकासही अटक केल्याची माहिती वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली.

वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले यांनी दैनिक ‘सुराज्य’शी बोलताना म्हणाले, या जीपमध्ये एकूण चालकासह १६ प्रवासी होते. यातील सहा जणांचा मृत्यू झाला. इतर दहा जण जखमी झाले. सर्व जखमींची प्रकृती चांगली आहे. सर्व जखमींचा जबाब घेतल्यानंतर हा अपघात कसा झाला, चालक फोनवर बोलत होता का ?त्याची काही चूक होती का? हे तपासात निष्पन्न होईल.

सुभाष पुजारी (रा. अक्कलकोट ) अशी अटक करण्यात आलेल्या जीप मालकाचे नाव आहे. तर महिंद्रा जीपचा चालक जलिल नझीर बागवान (रा. म्हेत्रेनगर, अक्कलकोट) शहर याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

काल मंगळवारी झालेल्या या अपघातात अक्कलकोट तालुक्यातील सहा जण ठार तर चालकासह दहा जण जखमी झाले होते. कुंभारी जवळील गंगाप्रसाद पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला होता. या अपघातात ठार झालेले सर्व सहाजण अक्कलकोट तालुक्यातील आहेत. त्यांची नावे व गावे अशी, कटेव्वा यलप्पा बनसोडे ( वय-५५), त्यांचा मुलगा बसवराज यलप्पा बनसोडे ( वय- ४२), भावाचा मुलगा आनंद इरप्पा गायकवाड ( वय- २५) सर्वजण राहणार ब्यागेहळ्ळी ता. अक्कलकोट, तर लक्ष्मण मुरलीधर शिंदे ( वय- ४२) राहणार बणजगोळ, ता.अक्कलकोट ), आनंद युवराज लोणारी ( वय- २८) हसापूर रोड, अक्कलकोट व  सुनीता सुनील महाडकर (वय ४० राहणार दोड्याळ ता. अक्कलकोट) अशी नावे आहेत.

* अपघातग्रस्त कुटुंबाना तात्काळ मदत जाहीर करा

अक्कलकोट – अक्कलकोट ते सोलापूर राज्य महामार्गावर कुंभारी गावाजवळ अवैध प्रवासी वाहतूक करणान्या जिप चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघाती मृत्यूमुखी व जखमी झालेल्या कुटूंबांना शासकीय त्वरित मदत मिळावी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने तहसीलदारांना मागणीचे निवेदन दिले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपामुळे अनेक सर्व सामान्य जनतेला याचा तीव्र फटका बसत आहे. काल अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गावर कुभांरी गांवाजवळ अवैध प्रवासी वाहतूक करणान्या जीप चालकाच्या निषकाळजीपणामुळे सहाजणांचा मृत्यू झाला. आठ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्य शासनाने एस . टी . कर्मचान्यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांचा सध्या धुमाकूळ सुरु आहे. तसेच अव्वाच्या सव्वा दर प्रवाशाकडून घेतले जात आहेत. एस टी प्रवास सुरक्षीत प्रवास आहे. अवैध प्रवासात सर्वसामान्य नागरीकांना आपले अनमोल जिव गमवावे लागत आहेत.

तात्काळ अपघातग्रस मृत कुटुंबाना तात्काळ २० लाख रुपये तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी पाच लाख रुपये तसेच सर्व जखमी रुग्णावर होणारा उपचार हा विनामूल्य करण्यात यावा, असे निवेदन तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या नेतृत्वात तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ यांना देण्यात आले. यावेळी रिपाई यु ता अध्यक्ष अप्पा भालेराव, शहर अध्यक्ष प्रसाद माने, तालुका उपाध्यक्ष अंबादास गायकवाड, जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी, चंद्रकांत गायकवाड, रविराज गायकवाड, दत्ता कांबळे, गोरख धोडमनी, कृष्णा धोडमनी,गणेश कांदे,शुभम मडीखांबे,सैपन शेख, सुरेश सोनकांबळे,विनायक होटकर,सोहेल उस्ताद यांची उपस्थिती होती.

You Might Also Like

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी

सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग

पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव

सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट

TAGGED: #accident #Jeep #owner #arrested #driver #remanded #judicialcustody, #कुंभारी #अपघात #जीप #मालकास #अटक #चालक #न्यायालयीन #कोठडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोहोळमध्ये कोयत्याने वार तर सोलापुरात पार्किंगवरुन तरुणाचा खुनाचा प्रयत्न
Next Article अनिल देशमुखांच्या त्रासाचा एक- एक मिनिट वसूल करू; बदला घेण्याचा इशारा

Latest News

सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान
देश - विदेश May 9, 2025
संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Top News May 9, 2025
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या
सोलापूर May 9, 2025
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी
सोलापूर May 9, 2025
सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग
सोलापूर May 9, 2025
crime
पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव
सोलापूर May 9, 2025
पंजाबमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद, परीक्षा रद्द
देश - विदेश May 9, 2025
सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट
सोलापूर May 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?