Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धक्कादायक! राज्यातल्या दंगली पूर्वनियोजित कारस्थान तर भाजप नेत्याचा शरद पवारांना विनंती वजा इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

धक्कादायक! राज्यातल्या दंगली पूर्वनियोजित कारस्थान तर भाजप नेत्याचा शरद पवारांना विनंती वजा इशारा

Surajya Digital
Last updated: 2021/11/18 at 9:48 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राज्यात मालेगाव, नांदेड, अमरावती इथे झालेल्या दंगली या सुनियोजित कारस्थान होतं. याबाबत महाराष्ट्र पोलिसांनी गृह मंत्रालयाला अहवाल सादर केला आहे. पोलिसांच्या तपासात सोशल मीडियावरील 60 ते 70 पोस्ट समोर आल्या आहेत. या पोस्टमुळे दंगली भडकल्याचा संशय आहे. यातील एक पोस्ट ही त्रिपुरामध्ये 7 मशिदी पाडल्याची फेक न्यूज सांगणारी आहे. त्यानंतर काही हजार पोस्ट सोशल मीडियावर फॉरवर्ड झाल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दंगलींची स्क्रिप्ट ही आधीच लिहिली गेली होती. पोलिसांच्या तपासात सोशल मीडियावरील 60 ते 70 पोस्ट समोर आल्या आहेत. या पोस्टमुळेच दंगली भडकल्याचा संशय आहे. यातील एक पोस्ट ही त्रिपुरामध्ये 7 मशिदी पाडल्याची फेक न्यूज सांगणारी आहे. त्यानंतर काही हजार पोस्ट सोशल मीडियावर फॉरवर्ड झाल्यात. गृह मंत्रालयाच्या अहवालात दंगलीला कारणीभूत ठरलेल्या 36 पोस्टचा उल्लेख आहे.

या अहवालात काही मुस्लिम संघटना आणि राजकीय पक्षांची भूमिका संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. 12 आणि 13 नोव्हेंबरलाही अशाच अनेक पोस्ट जाणूनबुजून व्हायरल करून लोकांची माथी भडकवली गेलीयेत. आता कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर मंत्रालय पोलिसांना कारवाईबाबत निर्देश देण्याची शक्यता आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* शरद पवारांना इशारा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी विनंती वजा इशारा दिला आहे की, शरद पवार यांनी अमरावतीत पाय ठेवू नये, असा इशाराच दिला आहे.

अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना इशारा आणि विनंती करताना म्हटलं आहे, पवारसाहेब तुम्ही अमरावतीत येऊ नका, तुम्हाला नागरीक आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल.

अमरावतीत ज्या 40 हजार मुस्लिमांना मोर्चा काढला, नंगा नाच केला, त्यामागे नवाब मलिक आहेत, या नवाब मलिकांसोबत दंगलीच्या सुत्रधारांचे फोटो झळकत आहेत, या नवाब मलिकांचे संरक्षक हे शरद पवार आहेत. तरी देखील शरद पवार कोणत्या तोंडाने विदर्भ दौऱ्यावर येत आहेत, ते समजत नसल्याचं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.

विदर्भात अवकाळी पाऊस, संत्रा फळगळती, पिक विमा यांची कोणतीही भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही तरी देखील शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर कोणत्या तोंडाने आले आहेत, असा सवालही उपस्थित केलाय.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #Shocking #BJPleader #Sharadpawar #request #dismiss #pre-planned #riots, #धक्कादायक #दंगली #पूर्वनियोजित #कारस्थान #भाजप #विनंती #वजा #इशारा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतात उगवली ‘कोरोना’ सदृश्य काकडी
Next Article बुलडाण्यातील विष घेतलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?