Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शाळेतून ४५ हजाराचे एलईडी आणि लॅपटॉपची चोरी; गोटेवाडीत रॉडने मारहाण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

शाळेतून ४५ हजाराचे एलईडी आणि लॅपटॉपची चोरी; गोटेवाडीत रॉडने मारहाण

Surajya Digital
Last updated: 2021/11/18 at 3:27 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : बोपळे (ता.मोहोळ) येथील जि.प. शाळेतील कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एलईडी, लॅपटॉप आणि प्रिंटर आदी ४५ हजाराचे साहित्य चोरून नेले. ही चोरी सोमवारी सकाळी उघडकीस आली .

बोपळे येथील शाळेला शनिवारी दुपारी सुट्टी होती. शाळेतील कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी घरी गेले होते. सोमवारी परतल्यानंतर त्यांना शाळेच्या कार्यालयातून इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्याप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर कुंडलिक गुंड (रा. अनगर ता.मोहोळ) यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एका संशयिताला अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हवालदार साठे पुढील तपास करीत आहेत

* गोटेवाडी येथे रॉडने मारहाण; एक जखमी

गोटेवाडी (ता.मोहोळ) येथे शेतातील ऊस खरेदी करून पैशाच्या देण्या-घेण्याच्या वादातून लोखंडी रॉड काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत ज्ञानेश्वर अर्जुन चौगुले (वय ३६रा.गोटेवाडी) हे गंभीर जखमी झाले. ही घटना काल मंगळवारी रात्री जखमीच्या घरासमोर घडली. त्यांना मोहोळ येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळासाहेब प्रभू शेळके, प्रभू शेळके, अमोल शेळके यांच्यासह सहा जणांनी मारहाण केली. अशी प्राथमिक  नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

* उसने पैसे वसुलीवरुन अपहरणाची व चोरीची फिर्याद

बार्शी : उसने दिलेल्या पैशाच्या व्यवहारावरुन दोघाजणांनी परस्पराविरोधात अपहरण करुन मारहाण केल्याची व ट्रॅक्टर चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिली आहे. त्यामुळे बार्शी तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

धनाजी गुणवंत लंबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते तालुक्यातील सुर्डी येथील रहिवाशी असून त्यांनी चार वर्षापूर्वी मालवंडी येथील शिवाजी व्हनमाने यांच्याकडून 30 हजार रुपये घेतले होते. ते सकाळी 10:00 वा. चे सुमारास गावातील सोनाली शेळके हिला परीक्षेसोठी कुर्डुवाडी येथे सोडण्यासाठी गेले होते.

तेथून परतत असताना मालवंडी बस थांब्याजवळ आले असता एका अनोळखी इसमाने थांबवून तु मला कट का मारला असे बोलुन शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तेंव्हा तेथेच उभा असलेला शिवाजी व्हणमाने याने त्यांना उचलून खाली आपटले. त्यानंतर त्याने व त्याचेसोबत असलेल्या इतर तीन अनोळखी इसमांनी त्यांना उचलून जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवले.  आणि माने यांच्या खडी क्रेशरच्या जवळ असलेल्या झाडीमध्ये नेवून, जर पैसे दिले नाहीत तर हातपाय बांधुन तळयात टाकुन जीवे मारण्याची धमकी दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

औदुंबर जालींदर व्हनमाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते मालवंडी येथील रहिवाशी असून शेतातल्या वस्तीवरून ते गावातील घराकडे गेले असता त्यांना दारात लावलेला न्यु हॉलन्ड कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रक्टर नं- एमएच 19 बीजी 5259 हा दोन अनोळखी लोक घेवुन जात असताना दिसल्यामुळे ते त्यांच्या पाठीमागे गेले.  त्यानंतर त्यांनी मुलगा शिवाजी याला फोन करुन सांगितल्यानंतर त्यांनी बस थांब्यावरील श्रीकांत बिडकर यांच्या पंक्चर काढण्याच्या दुकानाच्या समोर ट्रक्टर अडवला असता ट्रॅक्टर नेणारे दोघे हिसका देवुन पळुन गेले.

* दीराच्या मारहाणीत भावजय जखमी

सलगरवस्ती परिसरातील मधुकर उपलप वस्ती येथे पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून दगडाने केलेल्या मारहाणीत तेजस्विनी सिद्धलिंग संदोळकर (वय ३०) ही महिला जखमी झाली. ही घटना आज बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा दीर नरसिंग संदोळकर याने मारहाण केली. अशी नोंद सलगरवस्ती पोलिसात झाली आहे .

* काठीने मारहाण; पत्नी जखमी

विडी घरकुल परिसरातील शिरालिंग नगरात घरातील किरकोळ भांडणातून प तीने काठीने केलेल्या मारहाणीत पार्वती शाम श्रीनाळे (वय३०) ही डोळ्याजवळ मार लागल्याने जखमी झाली. ही घटना मंगळवारी रात्री च्या सुमारास घडली. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा पती शाम श्रीनाळे याने मारहाण केली अशी नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Theft #LEDs #laptops #school #Beaten #byrod #Gotewadi, #शाळा #एलईडी #लॅपटॉप #चोरी #गोटेवाडी #रॉड #मारहाण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बुलडाण्यातील विष घेतलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
Next Article महाराष्ट्राच्या लोककलेची दुबईत होणार हवा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?