Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुण्यातील एका स्वामीभक्ताने अक्कलकोटलला येऊन केली आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पुण्यातील एका स्वामीभक्ताने अक्कलकोटलला येऊन केली आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2021/11/19 at 10:33 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेल्या पुण्याच्या एका भक्ताने अक्कलकोटमधील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत झालेला भक्त त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला होता.

बाळासाहेब चंद्रशा गवळी (वय ४९, रा. कर्वेनगर, पुणे) असे त्या आत्महत्या केलेल्या स्वामीभक्ताचे नाव आहे. ही घटना काल गुरुवार (दि. १८) सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत घडली आहे. याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येचे कारण आणखी समजले नसून पोलिस शोध घेत आहेत. बाळासाहेब हे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथे येऊन एस. टी. स्टँडसमोरील अयोध्या लॉजवर उतरले होते.

स्वामी समर्थ मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. असे अचानक काय घडले की त्यांच्या मनात काही तरी चालले होते. ते पुन्हा लॉजवर आले. आतून कडी घालून रूममधील पंख्याच्या हुकाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी दरवाजा उघडत नसल्याने लॉजचालकांनी पोलिसांना बोलावून दार उघडले असता, हा प्रकार उघडकीस आला आहे.

यात लॉजचालक कमलेश बन्सीलाल परिआर (रा. बॅगेहळ्ळी रोड, अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील अधिक तपास हवालदार राजाराम फुलारी करीत आहेत.

* शहरात मोटारसायकल चोरीच्या दोन घटना

सोलापूर – मोटारसायकल चोरीच्या घटनेत वाढ झाली असून, शहरात दोन ठिकाणी दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

साईश दिनकर जंगाले (वय -५३, रा. धरमशी लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) यांची पंधरा हजार रुपये किमतीची एम.एच. १३ बी.झेड ११९८ क्रमांकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने मुरारजी पेठ सोलापूर येथून चोरून नेली आहे. जंगाले यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून,त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दुसरी चोरी ही एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील राघवेंद्र नगर जुना विडी घरकुलात झाली. फिर्यादी बालाजी नागेश बेत (वय-२९,रा. राघवेंद्र नगर,जुना विडी घरकुल,सोलापूर) यांची एम एच.१३.ए.वाय.५७०७ या क्रमांकाची पंधरा हजार रुपये किमतीची मोटारसायकल पार्क करून ठेवली होती. त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने राघवेंद्र नगर येथून त्यांची मोटरसायकल मुद्दामून चोरून नेली आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली.

* घराचा कडी-कोयंडा तोडून ३६ हजारांचे दागिने लंपास

सोलापूर – बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ३६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व मोबाईल चोरून नेल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान न्यू धोंडीबा वस्ती रामवाडी सोलापूर येथे घडली. याप्रकरणी नसीमा अब्दुल मसूद ढालायत (वय-३८,रा.न्यू धोंडीबा वस्ती, रामवाडी,सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गायकवाड हे करीत आहेत.

* लग्न कार्यास गेल्यावर चोरट्याने केले घर साफ

सोलापूर – लग्नकार्यासाठी गेल्यानंतर चोरट्याने घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी जगदंबा नगर जुळे सोलापूर येथे घडली. याप्रकरणी पांडुरंग लक्ष्मण गायकवाड (वय-६७,रा.जगदंबा नगर,जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी पांडुरंग गायकवाड हे बहिणीच्या मुलाच्या लग्नकार्यासाठी गेले होते. यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरामधील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास दुपोनि हे करित आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Swami #devotee #Pune #Akkalkot #committed #suicide, #पुणे #स्वामीभक्त #अक्कलकोटल #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोल्हापूरची कन्या उर्मिला अमेरिकेत नगरसेविका
Next Article “जो बोले सो निहाल… सत श्री अकाल” सोलापुरात श्री गुरुग्रंथ साहिबजीची पालखी मिरवणूक

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?