Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रोहित-द्रविड जोडीचा पहिला मालिका विजय, हर्षल पटेल सामनावीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

रोहित-द्रविड जोडीचा पहिला मालिका विजय, हर्षल पटेल सामनावीर

Surajya Digital
Last updated: 2021/11/20 at 10:20 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारताने न्यूझीलंडचा दुसऱ्या टी-२० त पराभव केला. तसेच ३ सामन्यांची मालिका २-० अशा फरकाने खिशात घातली. पहिल्यांदाच रोहित शर्मा भारतीय टी-२० संघाचा पूर्णकालीन कर्णधार आहे. नवीन कोच म्हणून राहुल द्रविडची ही पहिली मालिका आहे. मालिकेतील अखेरचा सामना रविवारी कोलकाता येथे खेळविण्यात येणार आहे.

रोहित-द्रविडच्या जोडीने यामध्ये बाजी मारत पहिला मालिका विजय साजरा केला आहे. भारताने शुक्रवारी लोकेश राहुलच्या ६५ व रोहित शर्माच्या ५५ धावांच्या जोरावर १५४ धावांचे आव्हान पार केले. हर्षल पटेलने भारतासाठी या सामन्यातून त्याचे टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि संघासाठी महत्वाची कामगिरी करत सामनावीर ठरला. त्याने टाकलेल्या चार षटकात २५ धावा दिल्या आणि डेरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या.

विजयानंतर सामनावीर निवडले गेल्यावर हर्षल पटेल म्हणाला की, “एवढ्या चांगल्या पदार्पणाची अपेक्षा केली नव्हती. जेव्हा तुम्ही प्रोसेसमध्ये असता, तेव्हा फक्त यामध्ये रमून जाता. सुधारणा वेळेसोबत होत असते, खासकरून माझ्या सारख्या लोकांसोबत, ज्यांच्याकडे जास्त गुणवत्ता नाही. मला माझा गेम स्वतः तयार करावा लागतो. मी चुका करतो आणि पुन्हा त्यातून शिकतो की, मी काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे.”

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

स्फोटक सुरुवात केलेल्या न्यूझीलंडला २० षटकांत ६ बाद १५३ धावांत रोखल्यानंतर भारताने १७.२ षटकांत ३ बाद १५५ धावा काढत सहज बाजी मारली. राहुलने पहिल्या सामन्यातील अपयश मागे टाकत ४९ चेंडूंत ६५ धावा काढताना ६ चौकार व २ षटकार मारले. कर्णधार रोहितनेही त्याला शानदार साथ देत ३६ चेंडूंत १ चौकार व ५ षटकार ठोकताना ५५ धावा केल्या. दोघांनी ११७ धावांची जबरदस्त सलामी देत भारताचा विजय निश्चित केला.

दोघे बाद झाल्यानंतर ॠषभ पंत (१२*) आणि व्यंकटेश अय्यर (१२*) यांनी भारताचा विजय साकारला. न्यूझीलंडकडून तिन्ही बळी कर्णधार टिम साऊदीने घेतले.   त्याआधी, मार्टिन गुप्टिल व डेरिल मिशेल यांनी स्फोटक सुरुवात करून दिल्यानंतरही न्यूझीलंडची वाटचाल मर्यादित धावसंख्येत रोखली गेली. भारतीयांनी पॉवर प्लेनंतर शानदार पुनरागमन करत किवींच्या फटकेबाजीवर अंकुश लावला. आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने २५ धावांत २ बळी घेतले.

भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
गुप्टिलने डावातील पहिल्या दोन चेंडूंवर चौकार मारत आपले इरादे स्पष्ट करताना भुवनेश्वर व चहर यांच्यावर हल्ला चढवला. त्याने १५ चेंडूंत ३१ धावांचा तडाखा दिला. डेरील मिशेलनेही २८ चेंडूंत ३१ धावा काढल्या. दोघांनी १० च्या धावगतीने फटकेबाजी केली. दोघे बाद झाल्यानंतर किवींची धावगती मंदावली. मात्र, ग्लेन फिलीप्सने २१ चेंडूंत ३४ धावा फटकावत १ चौकार व ३ षटकारांसह संघाच्या धावगतीला वेग देण्याचा प्रयत्न केला.

पॉवर प्लेमध्ये ६४ धावा कुटताना न्यूझीलंडने ८ चौकार व २ षटकार ठोकले. मात्र, यानंतर ७ ते ११ षटकांमध्ये किवींना केवळ एक चौकार मारता आला. आघाडीच्या चार फलंदाजांचा अपवाद वगळता किंवींकडून इतर कोणाला छाप पाडता आली नाही.

न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल झे. पंत गो. चहर ३१, डेरील मिशेल झे. सूर्यकुमार गो. हर्षल ३१, मार्क चॅपमन झे. राहुल गो. अक्षर २१, ग्लेन फिलिप्स झे. गायकवाड गो. हर्षल ३४, टिम सीफर्ट झे. भुवनेश्वर गो. अश्विन १३, जेम्स नीशाम झे. पंत गो. भुवनेश्वर ३, मिशेल सँटनर नाबाद ८, ॲडम मिल्ने नाबाद ५. अवांतर – ७. एकूण : २० षटकांत ६ बाद १५३ धावा. बाद क्रम : १-४८, २-७९, ३-९०, ४-१२५, ५-१३७, ६-१४०.

गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-०-३९-१; दीपक चहर ४-०-४२-१; अक्षर पटेल ४-०-२६-१; रविचंद्रन अश्विन ४-०-१९-१; हर्षल पटेल ४-०-२५-२.

You Might Also Like

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

TAGGED: #Rohit-Dravid #pair #win #firstseries #Hershalpatel #manofthematch, #रोहित-द्रविड #जोडी #पहिला #मालिकाविजय #हर्षलपटेल #सामनावीर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आणखी एका एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, कामगारांमध्ये रोष
Next Article ‘80% कर्मचाऱ्यांची संमती असेल तर एसटीचे खासगीकरण शक्य, आम्ही होऊ देणार नाही’

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?