सोलापूर : वीस दिवस होऊन गेले राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रावर होत आहे. तसाच शिक्षणावरही होत आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्रावरही एसटी संपाचा परिणाम जाणवत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं अनेक ठिकाणच्या परीक्षांवर परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पीएच.डीच्या मुलाखती दुसऱ्यांदा लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठ प्रशासनानं मूळ वेळापत्रकात बदल करत 23 नोव्हेंबरपासून मुलाखतींचं आयोजन केलं होतं. मात्र, आणखी एकदा मुलाखती लांबणीवर टाकल्या आहेत. आता 30 नोव्हेंबरपासून मुलाखती होणार आहेत.
विद्यापीठातील पीएच.डीच्या मुलाखती दुसऱ्यांदा लांबणीवर गेल्या आहेत. विद्यार्थ्यांना नवं वेळापत्रक विद्यापीठाची वेबसाईट http://www.sus.ac.in/ वर पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांनी यासंदर्भातील अपडेटसाठी वेबसाईटला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीनं पीएच.डी. मौखिक परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा अद्याप संप सुरू असल्यामुळे मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखतींचा कार्यक्रम आता 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर च्या दरम्यान होणार आहे, असं विद्यापीठ प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या पीएचडी प्रवेशासाठीची मौखिक परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणं 16 ते 22 नोव्हेंबरच्या दरम्यान परीक्षा होणार होत्या. मात्र, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 23 ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान परीक्षा घेण्याचं निश्चित केलं होतं. अद्याप एसटी कर्मचाऱ्यांचा संप न मिटल्यानं पुन्हा एकदा नव्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
* आर्थिक कारणावरुन ऊसतोड कामगाराचे अपहरण
बार्शी : आर्थिक कारणावरुन ऊस तोड कामगाराचे अपहरण झाल्याची घटना येथील मांडेगाव ते बार्शी रस्त्यावर घडली आहे. याबाबत अपहरण झालेल्या पत्नी आशाबाई भागवत नागरगोजे (मुळ रा. रोहोतवाडी ता. पाटोदा जि. बीड हल्ली रा. इंद्रेश्वर साखर कारखान्याजवळ, उपळाई ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भागवत नागरगोजे हे ट्रॅक्टरमधून दुपारी 5 च्या सुमारास जात असताना एमआयडीसी जवळील सुखदेव नगर समोर संतोष ज्ञानोबा डिसले व त्याचा मावस भाऊ संतोष नवनाथ डिसले व इतर दोन अनोळखी इसम (रा. डिसले वाडी ता. शिरुर जि. बीड ) यांनी बोलेरो जीपमध्ये आले. पैशाच्या व्यवहारातून घातपात करण्याचे उद्देशाने ट्रॅक्टरमधून खाली ओढून दमदाटी केली. लाथाबक्क्याने मारहाण करुन जीपमध्ये जबरदस्तीने घालून पळवुन नेले. याबाबत अधिक तपास पोउपनि. गजानन कर्णेवाड करीत आहेत.