मुंबई : एसटी कर्मचाऱ्याचा विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. एसटी कर्मचारी आता आक्रमक झाले असून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चेकऱ्यांना सध्या आझाद मैदानावर अडवण्यात आलं आहे. आंदोलकांची राज्य सरकार विरोधात मोठी घोषणाबाजी सुरु आहे.
परबांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या या मोर्चेकऱ्यांना सध्या आझाद मैदानावरच अडवण्यात आलं आहे. दरम्यान, अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आझाद मैदानावरील आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात मोठी घोषणाबाजी सुरु आहे. सरकार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असून आम्ही परबांच्या घरावर मोर्चा करणार काढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगितलं.
दरम्यान, अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एसटी संपाच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. एक महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर बोलताना अनिल परब यांनी म्हटलंय की, एसटीच्या संपाची ज्या युनियने नोटीस दिली होती त्या संघटनेचे अध्यक्ष गुजर, वकील सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्यासोबत बैठक झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंत्री परब म्हणाले की, आंदोलन करणं त्यांचा अधिकार आहे. परंतु कुणाच्या तरी सांगण्यावरुन त्यांनी कसलीही कृती करु नये. जे भडकवत आहेत, ते नुकसान झाल्यावर मदतीला येत नाहीत. राजकारण करण्यासाठी जे भडकवत आहेत, कामगारांनी त्यांच्यामुळे स्वताच नुकसान करुन घेऊ नये. मी कामगारांशी लढा देऊ इच्छित नाही, ते माझेच कामगार आहेत, एसटीचे कामगार आहेत. भावना भडकलेल्या असताना चुकीचं पाऊल उचलू नका, असे आवाहन केले.
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार राज्य सरकारने 297 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. तर रोजंदारीवर असणाऱ्या 238 कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. अनेक प्रयत्न करूनही एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने राज्य सरकारने आता आक्रमक पवित्रा घेत निलंबन करण्यास सुरुवात केली आहे.
एसटीच्या विलीनीकरणाची मागणी पूर्ण करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले आहे. कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण याच्यातला मध्यममार्ग सुचवला असून सरकारने निर्णय घ्यावा असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे एसटीचे विलीनीकरण सध्या तरी अशक्य असल्याचे म्हटले जात आहे.