Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पतीने केले दुसरे लग्न केल्याने पहिल्या पत्नीने केले विषप्राशन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पतीने केले दुसरे लग्न केल्याने पहिल्या पत्नीने केले विषप्राशन

Surajya Digital
Last updated: 2021/11/24 at 9:03 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : गुंजेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथे राहणाऱ्या पूजा संदीप पाटील (वय ३०)  या विवाहीतेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला. ही घटना मंगळवारी (ता.२४) सकाळच्या  सुमारास घडली. तिला शंकर पवार (वडील) यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पूजा हिचा पती संदीप पाटील यांनी दुसरे लग्न केले. हा प्रकार समजल्यानंतर त्याचे टेन्शन घेऊन तिने विषारी द्रव प्राशन केली, अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

* चारचाकी वाहनांच्या अपघातात दुचाकीवरील तिघे जखमी

तुळजापूर रोडवरील हिप्परगा परिसरातील पुलाजवळ चार चाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील सौरभ बाळू गजाकोश (वय २५), अमोल इरेश शटगार (वय ३२ दोघे  रा. मौलाली चौक) आणि राजू यल्लाप्पा  बुगले (वय२४. रा.बापुजी नगर) असे तिघे जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडला. ते तिघेजण दुचाकीवरून तुळजापूर ते सोलापूरच्या दिशेने येत होते. या अपघाताची नोंद  जोडभावीपेठ पोलिसात झाली आहे.

* आष्टे येथे आत्महत्येचा प्रयत्न

आष्टे (ता.मोहोळ) येथे राहणाऱ्या अर्चना दिलीप कापुरे (वय २३) या महिलेने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. तिच्यावर मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* हन्नुर येथे चंदन चोरांना अटक; २ लाख ३२ हजाराचा माल जप्त

अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुचाकीवरुन जाणाऱ्या चंदन चोरांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून २२ किलो चंदनाची लाकडे, दुचाकी आणि इतर साहित्य असा २ लाख ३२ हजाराचा माल जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली .

विजय शिवाजी फसके (वय ४०) गणेश शिवाजी घोडके (वय ३५ दोघे रा. मालेगाव ता.बार्शी) आणि नितीन राऊत (वय ३० रा. सर्जापूर ता. बार्शी )अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

हन्नुर ते इटकळ मार्गाकडे दुचाकीवरून चंदनचोर जाणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास इटकळ मार्गावर सापळा रचला. तेव्हा दुचाकीवरुन फसके आणि घोडके असे इटकळच्या दिशेने निघाले होते.

पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता दोघेही पसार झाले. तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून २२ किलो चंदनाची लाकडे, दुचाकी आणि इतर साहित्य असा २ लाख ३२ हजाराचा माल जप्त केला. चोरीचे चंदन हे त्यांनी सर्जापूर येथील नितीन राऊत याला विकणार असल्याचे समजले. त्याप्रमाणे पोलिसांनी तिघांविरुद्ध चोरी आणि भारतीय वन अधिनियमाप्रमाणे  अक्कलकोट उत्तर पोलिसात गुन्हा दाखल केला.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार खेडकर, सहाय्यक फौजदार खाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले आणि समीर शेख यांनी केली पुढील तपास फौजदार खेडकर हे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Husband's #second #marriage #poisoned #firstwife, #पती #दुसरेलग्न #पहिल्या #पत्नी #विषप्राशन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एसटी संप – कर्मचारी उद्या निर्णय जाहीर करणार; इतिहासातली सर्वात मोठी पगारवाढ
Next Article ‘रात्रीस खेळ चाले’ मध्ये ‘शेवंता’च्या भूमिकेत आता दिसणार ही अभिनेत्री

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?