सोलापूर : पोलीस आयुक्त कार्यालयाने शहरात जमावबंदीचा आदेश जारी केला असताना सुद्धा या आदेशाचे उल्लंघन करून वीस ते तीस लोकांनी मिळून या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या जमाव जमवून जल्लोषात सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केला. यात सहाजणांवर गुन्हा दाखल झाला.
मोठमोठ्याने फटाक्यांची, अतिशबाजी केल्याप्रकरणी जेलरोड पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक वाजिद पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीनिवास किशोर सगा (वय 34. रा. न्यू पाच्चा पेठ सोलापूर). हरीश रामशरण येमूल (वय 39 रा. भवानी पेठ घोंगडे वस्ती सोलापूर),किसन अशोक पासकंटी (वय 26, रा. न्यू पाच्चा पेठ, विजय नगर सोलापूर), श्रीकांत जनार्दन इंजापूरी (वय 30 रा. भाग्यनगर जुने विडी घरकुल सोलापूर), विजय हनुमंत जटला (वय 35 रा. शिवसेना नगर, नवीन विडी घरकुल सोलापूर) , किसन विठ्ठल दावत (वय 30 रा. दाजी पेठ सोलापूर) या सहा जणांच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून वाढदिवस साजरा करत असताना आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल भालशंकर हे करीत आहेत.
* दुचाकीची तरुणाला धडक ; एकावर गुन्हा
सोलापूर – दुचाकीची तरुणाला धडक देऊन त्याच्या अपघातास कारणीभूत ठरल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नेहरूनगर शासकीय मैदानाजवळ विजापूर रोड सोलापूर येथे घडली. याप्रकरणी मयुरेश रेवन कटकधोंड (वय-२७,रा.नेहरू नगर,विजापूर रोड, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गणेश शंकर चौधरी (वय-३५, रा. नरेंद्र नगर सैफुल विजापूर रोड सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी मयुरेश हे त्यांच्या वडिलांच्या नावे असलेली मोटारसायकल क्रमांक एम.एच.१३ बीटी ३३६९ या वरून जात होते.त्यावेळी गणेश चौधरी याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगाने चालवून फिर्यादीच्या मोटरसायकलला धडक देऊन मयुरेश यांच्या डोक्यात मुक्का मार लागून अपघात करण्यास कारणीभूत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस नाईक शेळके हे करीत आहेत.
* किरकोळ कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण; चार जणांवर गुन्हा
सोलापूर – किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुकुंदनगर लक्ष्मी मंदिराजवळ सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी आशा संभाजी भडकुंबे (वय-४५, रा. मुकुंदनगर लक्ष्मी मंदिर जवळ, सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दीपक बारशिंगे, अभिषेक बारशिंगे, निरंजन बारशिंगे, कपिल बारशिंगे (सर्व. रा. मुकुंदनगर सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या राहत्या घराजवळील सार्वजनिक शौचालय येथे फिर्यादीचा मुलगा याच्या नावाने दीपक बारशिंगे हा शिवीगाळ करीत आहे, असे फिर्यादीच्या बहिणीची मुलगी हिने सांगितल्याने फिर्यादी हे दीपक बारशिंगे विचारण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयित आरोपी हा फिर्यादीस शिवीगाळ करीत असताना फिर्यादीचा मुलगा तेथे आला असता त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दीपक बारशिंगे याने फिर्यादीच्या डोक्यात विट मारली. तसेच अभिषेक बारशिंगे व कपिल बारशिंगे यांनी फिर्यादीचा मुलगा शेखर याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलिस नाईक कांबळे हे करीत आहेत.