सांगली : सांगली जिल्ह्यात आज मनपा क्षेत्रात 117 नवीन रुग्ण, शहरी भागामध्ये 9, ग्रामीण विभागात 42 रुग्ण वाढले आहेत. 168 नव्या रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 3 हजार 916 वर पोहोचली आहे.
आज अखेर बरे झालेली रुग्णसंख्या 1 हजार 677 आहे. आज उपचारा खाली 2 हजार 121 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 118 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे. मनपा क्षेत्रातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आजअखेर ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 1 हजार 278, शहरी भागातील 272, मनपा क्षेत्रातील 2 हजार 366 अशी आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज आरटीपीसी टेस्ट 1 हजार 97 जणांची घेण्यात आली. पैकी 132 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. 439 एंटीजन टेस्ट पैकी 48 पॉझिटिव्ह आले. तालुकानिहाय आजची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या जत 2, कवठेमहांकाळ 3, खानापूर 2, मिरज35, पलूस 1, शिराळा 2, तासगाव 3, वाळवा 3, सांगली 68, मिरज 49 अशी आहे.
आजच्या पाच मृतांमध्ये कोरेगाव येथील 52 वर्षांचा पुरुष, नळभाग येथील 64 वर्षांचा पुरुष, कोकळे येथील 60 वर्षांचा पुरुष, नागाव येथील 80 वर्षांचा पुरुष, वाळवा येथील 66 वर्षांची महिला, असा आहे.
तालुकानिहाय आज अखेर पॉझिटिव्ह रुग्ण पुढील प्रमाणे आहे. आटपाडी 145,जत188, कडेगाव 76, कवठेमहांकाळ 151, खानापूर 71, मिरज 316 पलूस 138,शिराळा 205, तासगाव 105, वाळवा 155, मनपा 2 हजार 366 अशी आहे.