कानपूर – पहिल्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडला पहिल्या डावात 296 धावांवर बाद केले आहे. भारताकडून अक्षर पटेलने 5 विकेट्स घेतल्या. तर आर. अश्विनने 3 फलंदाजांना बाद केले. भारताने पहिल्या डावात 345 धावा केल्या आहेत. तर भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात वाईट झाली आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल 1 धाव काढून बाद झाला आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने चहापानापर्यंत 6 गडी गमावत 249 धावा बनवल्या. न्यूझीलंड 96 धावांनी पिछाडीवर होता. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने 95 धावांची खेळी केली होती. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला आहे. टॉम लॅथम आणि विल यंग यांनी बिनबाद 129 धावांवरून आज पुढे फलंदाजीला सुरुवात केली.
Stupendous bowling performance from @akshar2026 today 👏👏#INDvNZ @Paytm pic.twitter.com/8tbMK6fitk
— BCCI (@BCCI) November 27, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतीय फिरकीपटू अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या योगदानामुळे न्यूझीलंडचा अर्धा संघ गारद झाला. यंग आणि लॅथम या दोघांना शतकाने हुलकावणी दिली. अक्षरने पाच बळी टिपत न्यूझीलंडच्या डावाला सुरूंग लावला. भारताने आपल्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली आहे. भारताकडे 49 धावांची आघाडी आहे. भारताचा पहिला डाव 111.1 षटकात 345 धावांवर आटोपला. पदार्पणाचा कसोटी सामना खेळणारा मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने 105 धावांची शतकी खेळी केली.
अक्षर पटेलनं भारताकडून सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. त्याने रॉस टेलर 11(28), हेन्री निकोलस 2(9), टॉम ब्लुण्डेल 13(94), रचिन रविंद्र 13(23) आणि साउदी 5(13) यांची विकेट घेतली. अश्विनने तिघांना बाद केले. तर उमेश यादव आणि जाडेजाला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
* दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
भारत – अजिंक्य रहाणे (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि उमेश यादव.
न्यूझीलंड – टॉम लॅथम, विल यंग, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर) , रचिन रवींद्र, टिम साऊदी, एजाज पटेल, काइल जेमीसन, विल सोमरविले.