Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात एसटीवर दगडफेक; चालक जखमी, ‘नो बॉल’ दिल्याने अंपायरचे डोके फोडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात एसटीवर दगडफेक; चालक जखमी, ‘नो बॉल’ दिल्याने अंपायरचे डोके फोडले

Surajya Digital
Last updated: 2021/11/28 at 10:38 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : क्रिकेट खेळताना नो बॉल दिला म्हणून अंपायरचे डोके फोडल्याची घटना घडली. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

क्रिकेट खेळताना  नो- बॉल दिला म्हणून अंपायर म्हणून खेळणा-या रविंद्र खंडेपल्ली (वय २३ रा. गांधीनगर,लष्कर) याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून भिंतीवर डोके आपटल्याने तो जखमी झाला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

काल सायंकाळच्या सुमारास दत्तनगर येथील संगा पान दुकानाजवळ काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यावेळी सुमित  खंडे पल्ली याने नोबॉल डिक्लेअर केला. तेव्हा सुरेश  कुकुल या खेळाडूने त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याचे डोके भिंतीवर आदळले. त्यामुळे डोक्यास मार लागून तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे .

* एसटीवर दगडफेक; ड्रायव्हर जखमी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी कॅनॉल पाटीजवळ अनोळखी इसमाने बसवर दगडफेक केल्याने सिद्धाराम द-याप्पा गुरव (वय ४९ रा. बाळे ता.उत्तर सोलापूर) हे बस चालक जखमी झाले. ही घटना काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

सिद्धाराम हे भंडारकवठे येथून  सोलापूरकडे एसटी घेऊन निघाले होते. निम्बर्गी पाटीजवळ अनोळखी इसमाने दगडफेक केल्याने समोरची काच फुटली. आणि छातीवर दगड लागल्याने ते जखमी झाले. त्यांना मंद्रूप येथे प्राथमिक उपचार करुन शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* शॉक बसून मुलगा जखमी

डिग्गेवाडी (ता.अक्कलकोट) येथे घराशेजारच्या धाब्यावर खेळत असताना विद्युत वहिनीच्या शॉक बसल्याने संतोष सचिन जाधव (वय १४) या मुलाच्या हाताला शॉक बसून तो किरकोळ जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. त्याला अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

* नशेत आत्महत्येचा प्रयत्न

शंकरगाव (ता.पंढरपूर )येथे राहणाऱ्या लिंगादेव मारुती पांढरे (वय २८) याने दारुच्या नशेत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला. ही घटना आज रविवारी सकाळी घडली. त्याला पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात रामदास होनमाने (मित्र) यांनी दाखल केले.

* वडवळ येथे आत्महत्येचा प्रयत्न

वडवळ (ता.मोहोळ) येथे राहणाऱ्या सूर्यभान यशवंत जगताप (वय ८०)  या वृद्धांनी रागाच्याभरात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला.

ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी बेशुद्धावस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे .

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Stone #umpire #head #noball, #सोलापूर #एसटीवर #दगडफेक #चालक #जखमी #नोबॉल #अंपायर #डोके #फोडले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पतीने पत्नीला केलेली मारहाण योग्य आहे का ? धक्कादायक सर्व्हे; देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या सर्वाधिक
Next Article भारताला विजयासाठी 9 विकेट्सची गरज, कोण जिंकणार? भारत की न्यूझीलंड

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?