कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी म्हणजे आज भारताला विजयासाठी 9 विकेट्सची आवश्यकता आहे तर न्यूझीलंडला 280 धावा करायच्या आहेत. कोणता संघ जिंकेल ? भारत की कोण जिंकणार? भारत की न्यूझीलंड याबाबत उत्सुकता लागलीय.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. भारताने न्यूझीलंडसमोर 284 धावांचे आव्हान ठेवले आहे. चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 1 गडी गमावत 4 धावा केल्या. आता पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 9 विकेट्सची आवश्यकता आहे. त्यामुळे भारत विजय मिळवणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
काल काही भारतीय खेळाडूने दर्जेदार खेळाचं दर्शन घडवलं. ज्यामुळे भारताने आधी 234 धावांवर डाव घोषित करत न्यूझीलंडला 284 धावांचं आव्हान दिलं. ज्यानंतर अखेरच्या काही षटकात एक विकेटही घेतली असल्याने आता न्यूझीलंडला 9 गड्यांच्या मदतीने 280 धावा करण्याची गरज आहे. तर भारताला जिंकण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चौथ्या दिवशी एकीकडे सुरुवातीपासून भारताचे एकापाठी एक खेळाडू तंबूत परतत असताना या कसोटीचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरने अनुभवी आर आश्विनसोबत डाव सांभाळला. आश्विनने महत्त्वपूर्ण 32 धावा केल्यानंतर तो बाद झाला. नंतर अय्यरने मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण तोही 65 धावा करुन तंबूत परतला.
ज्यानंतर शेवटच्या फळीतील रिद्धिमान साहा (नाबाद 61) आणि अक्षर पटेल (नाबाद 28) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यानंतर अखेर भारताने 234 धावा झाल्यानंतर डाव घोषित करत किवींना विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. ज्यानंतर गोलंदाजी करताना आश्विनने तिसऱ्याच षटकात सलामीवीर विल यंगला पायचीत करत दिवस अखेर न्यूझीलंडची अवस्था 4 वर एक बाद अशी केली आहे. आता पाचव्या दिवशी किवींना विजयासाठी 9 गड्यांच्या मदतीने 280 धावा करण्याची गरज आहे.
* अय्यर पुन्हा चमकला
दिवसाच्या सुरुवातीपासून भारताचे फलंदाज एक एक करुन तंबूत परतत होते. पण त्याचवेळी पहिल्या डावात सलामीच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या श्रेयसने संघाची जबाबदारी घेत एक उत्तम खेळी खेळला. त्याला आश्विननेही 32 धावांची चांगली साथ दिली. अय्यरने आज 125 चेंडूत 65 धावा केल्या. एकाच सामन्यात दोन शतकं ठोकण्यापासून तो 35 धावांनी हुकला. तर दुसरीकडे मानेच्या दुखापतीमुळे क्षेत्ररक्षणापासून लांब राहिलेल्या रिद्धिमान साहानेही 126 चेंडूत 61 धावा करत संघासाठी महत्त्वाचं योगदान दिलं.
दरम्यान, न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अक्षर पटेलने 5 विकेट घेत अनेक विक्रम मोडले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक 5 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याच्या कायले जेमिन्सनच्या विक्रमाशी त्यानं बरोबरी केली. कारकिर्दीच्या पहिल्या 4 कसोटीत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत त्यानं दुसरं स्थान पटकावलं. कसोटीत सलग 4+ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अक्षरनं तिसरे स्थान पटकावले.