मुंबई / पुणे : पुणे महापालिकेनं शाळेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा उद्यापासून सुरू होणार नाहीत. 15 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
राज्यात 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु मुंबई महापालिकेने उद्यापासून शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आता 15 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. नाशिक महापालिकेनेही पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकला आहे.
ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. मुंबईतील शाळाही 15 तारखेपासून सुरू होणार आहेत. तर नाशिक महापालिकेने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. औरंगाबाद शहरातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार नाहीत.
शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांनी एक डिसेंबरपासून शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर राज्यात पहिली ते सातवीचे वर्ग उद्यापासून सुरू होणार आहेत. लहान मुलांच्या आवाजाने शाळा पुन्हा एकदा गजबजणार आहेत.
मात्र औरंगाबाद शहरातील शाळा सुरू होणार नाहीत. ग्रामीण भागातील शाळा सुरू उद्यापासून सुरू होणार आहेत. औरंगाबादच्या ग्रामीण भागातील शाळा उद्यापासून सुरू करणार असल्याची माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. औरंगाबाद शहरातील शाळांबाबतचा निर्णय 10 डिसेंबरनंतर परिस्थिती पाहून घेण्यात येईल असे मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे राज्यात पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवास असले तरी 1 डिसेंबरपासून म्हणजेच उद्यापासून शाळा भरणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या संदर्भात शासननिर्णय जारी झालाय. गर्दी टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आलेत. पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत सरकारचा निर्णय झाला असला तरी नाशिक पालिका हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. नाशिक पालिका या संदर्भात 10 डिसेंबरला निर्णय घेणार आहे. सध्या राज्यातील ग्रामीण भागांत पाचवी ते बारावी आणि शहरी भागांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत.
* शाळांबाबत मार्गदर्शक सूचना
– शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण बंधनकारक.
– विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक
– वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.
एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी असावेत.
– शाळेतील एखादा विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्यास तात्काळ शाळा बंद करण्याची सूचना.