मुंबई : कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या 1983 च्या विश्वचषक विजयावर आधारित ’83’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता रणवीर सिंगने ट्विट करून याची माहिती दिली. 24 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या 1983 च्या विश्वचषक विजयावर आधारित ’83’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता रणवीर सिंगने ट्विट करून याची माहिती दिली. ‘बेटा जीत के आना, कोई बेस्ट ऑफ शेस्ट ऑफ लक नहीं, बस जीत के आना, असं कॅप्शन देत त्याने एक पोस्टर शेअर केला. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या टीझरने पुन्हा एकदा ऐतिहासिक क्रिकेट विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह ’83’ या चित्रपटात भारतीय संघाचा माजी कर्णधार ‘कपिल देव’ यांच्यासारखा दिसत आहे. त्याचबरोबर दीपिकाने कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटियाची भूमिका साकारली आहे.
https://twitter.com/jagan_manthri/status/1465686128149757956?t=TtIYmZXjxkswWGhxVMb_qA&s=19
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकल्याचा ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत करण्याचा यशस्वीरीत्या प्रयत्न केलाय. दीपिकाचा पादुकोणचा रणवीर सिंहसोबतचा हा चौथा चित्रपट आहे.
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या हुबेहुब लूकमागचे श्रेय मेकअप करणाऱ्या व्यक्तीला दिले पाहिजे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्याही भूमिका आहेत.
इतिहास घडवण्यासाठी भारतीय संघाने वेगवेगळ्या अडचणींवर मात कशी केली, यावर हा चित्रपट केंद्रित आहे. भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना ‘माझ्या संघाची कहाणी’ असे अभिमानाने म्हटले आहे.
कबीर खान दिग्दर्शित ’83’ ची कथा भारताच्या ऐतिहासिक 1983 क्रिकेट विश्वचषक विजयाभोवती फिरते. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने 25 जून 1983 रोजी विश्वचषक जिंकत इतिहास रचला. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. तो पाहिल्यावर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.