नवी दिल्ली : भारत सरकारविरोधात वादग्रस्त भूमिका घेणारे ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांच्यावर ट्विटर सोडायची वेळ आली आहे. त्यानंतर आता ट्विटर बोर्डाने भारतीय असलेले पराग अग्रवाल यांची कंपनीचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे.
परागने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट आणि आयआयटी बॉम्बेमधून बॅचलर डिग्री मिळवली आहे. 2018 मध्ये त्यांना ट्विटरचे सीटीओ बनवण्यात आले. पराग 2011 मध्ये ट्विटरवर रुजू झाले. भारतात जन्मलेल्या पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बेमधून पदवी घेतली आहे. ट्वीटरशिवाय त्यांनी याहू, माइक्रोसॉफ्ट आणि AT&T यासारख्या दिग्गज कंपनीमध्ये काम केलं आहे.
अग्रवाल यांचा जन्म मुंबईत झाला आहे. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग केली. त्यानंतर ते 2005 मध्ये यूएसला गेले आणि संगणक सायन्समध्ये डॉक्टरेट करण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठात दाखल झाले. तिथं डेटाबेसवर केंद्रित असलेल्या संशोधन गटात ते सामील झाले. 2011 मध्ये पीएचडी पूर्ण करण्यापूर्वी ते ट्विटरमध्ये जॉईन झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचं ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून प्रमोशन झालं. आता ते ट्विटरचा सीईओ बनले आहेत.
ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती स्वत:च्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपलं पद सोडताना त्यांनी ट्विटरचे पुढचे सीईओ पराग अग्रवाल असतील, असं सांगितलंय. संपूर्ण बोर्डाने त्यांना एकमताने पुढील सीईओ म्हणून निवडल्याचंही त्यांनी सांगितलंय. डॉर्सी यांनी 2006 मध्ये ट्विटरच्या स्थापनेमध्ये मदत केली होती. 2008 पर्यंत त्यांनी सीईओ म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते या पदावरुन पायउतार झाले होते. मात्र, तत्कालीन सीईओ डिक कोस्टोलो यांनी पद सोडल्यानंतर ते पुन्हा सीईओ म्हणून रुजू झाले होते.
ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा नुकताच कार्यभार स्वीकारणाऱ्या पराग अग्रवाल यांचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले. या व्हायरल फोटोतून त्यांचं क्रिकेटप्रेम पाहायला मिळत आहे. भारतानं एकदिवसीय विश्वचषक 2021 जिंकल्यानंतर पराग अग्रवाल विजय साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये पराग मित्रांसोबत दिसत आहे. तसेच त्यांच्या हातात तिरंगा आहे.
पराग अग्रवालच्या निवडीवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलं असून ते म्हणतात की, “हा एक प्रकारचा पॅन्डेमिक आहे आणि भारतीय वंशाचं असल्याचा आम्हाला आनंद वाटतोय. हा भारतीय सीईओ व्हायरस असून यावर कुठेही लस सापडणार नाही.” तर टेस्लाच्या इलॉन मस्क यांनीही ट्वीट केलं असून ते म्हणाले की, भारतीय कौशल्याचा फायदा हा अमेरिकेला मोठ्या प्रमाणात झाला आहे.