Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विद्यार्थ्यांच्या अन् शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसला आनंद; सोलापूर जिल्ह्यातील 4332 शाळांची वाजली घंटा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

विद्यार्थ्यांच्या अन् शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसला आनंद; सोलापूर जिल्ह्यातील 4332 शाळांची वाजली घंटा

Surajya Digital
Last updated: 2021/12/01 at 7:58 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर कालपासून जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार यांनी शाळांना भेटी देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. सोलापूर जिल्ह्यातील 4332 प्राथमिक शाळा यामुळे आजपासून सुरु होत आहेत.

काल सकाळपासूनच त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी, धोत्री व दिंडूर या गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी, कन्नड, उर्दू माध्यमांच्या शाळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी उपस्थित होते.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांनाही आनंद झाला. शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत प्रत्येक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते. काही शाळांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली होती. त्या फेरीमध्येही ते सहभागी झाले. धोत्री येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून बॅग आणि पाणी पिण्यासाठी बाटली वाटप करण्यात आले.

शाळांमध्ये राबविण्यात आलेले उपक्रम, शाळा बंद असताना करून घेतलेली रंगरंगोटी, स्वच्छता आणि सुशोभीकरण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण, सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझेशन या नियमांचे कडेकोट पालन करून, आजपासून सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये विदयार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मागील दीड वर्षांपासून हरवलेला जिवंतपणा पुन्हा नव्याने शाळांमध्ये परतला आहे.

विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले आहे. महापालिका शाळेमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. विद्यार्थ्यांना रिक्षा, कारमधून आणून प्रवेशोत्सव साजरा केला. काही शाळांमध्ये वृक्ष लागवड औक्षण करून विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Anand #Solapur #appeared #faces #students #teachers, #विद्यार्थी #शिक्षक #चेहऱ्यावर #आनंद #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरातील ऑर्केस्ट्राबारमधील पियानो वादकाने केली आत्महत्या
Next Article ‘एका राज्यापुरता मर्यादीत पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही’

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?