मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काँग्रेस मुक्त विरोधी पक्षांची आघाडी तयार करत आहेत. यावरुन काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे. एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची आज मुंबईत भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही त्या भेटणार होत्या. पण प्रकृतीच्या कारणामुळे उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही.
आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय असल्याचं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तीगत महत्त्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आल्याचं देखील म्हणून दाखवलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपाविरोधात ठामपणे उभे राहिले. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुल मोदी सरकारविरोधात लढले, असे नाना पटोले म्हणाले.
राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेसहाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
* ममता बॅनर्जी भडकल्या
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जींनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस निशाणा साधला. यूपीए अस्तित्वात नाही, असं त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही हल्लाबोल केला. राहुल गांधींचं नाव न घेता ममतादीदींनी त्यांच्यावर टीका केली. तसेच शरद पवार युपीएचे नेते होणार का? असा सवाल ममता बॅनर्जींना विचारण्यात आला होता. त्यावेळी ममता बॅनर्जी भडकल्याचं पहायला मिळाल्या. ‘काय युपीए युपीए करता. युपीए नाहीये आता’, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता काँग्रेसला आगामी लोकसभेत डच्चू देणार असल्याचा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.