जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात क्रूझर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. पावसामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात जाणारी क्रुझर गाडी पलटी झाली. ही घटना बुधवारी (ता.१) रात्री साडेदहाच्या सुमारास भावसार पेट्रोल पंपाजवळ घडली.
ही घटना जळगावच्या हिरापूर गावाजवळ नांदगाव रस्त्यावर घडली आहे. दरम्यान, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पाचोरा तालुक्यातील डोंगर गाव येथील काही मजूर नांदगावकडे जात असताना चाळीसगाव तालुक्यात असलेल्या हिरापूर गावाजवळ चारचाकी (एम एच 19 ए सी 5604) ही गाडी पलटी झाली. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा जण जखमी झाले.
जिल्ह्यात अवकाळीपासून सुरू असल्याने भरधाव वेगात जात असलेल्या चारचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली होती. यातील चार जण गाडी खाली दबली गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तर काही जण गाडीत अडकून पडले होते. त्यांना परिसरातील नागरिकांनी मदतीला धावत येत रुग्णालयात भरती केले आहे. जीपने मनमाडला गेले होते. तेथून परतत असताना चाळीसगाव तालुक्यातील हिरापूरजवळ त्यांची चारचाकी पलटी झाल्याने हा अपघात झाला.
पाऊस व अंधार असल्यामुळे मदतकार्याला अडथळा निर्माण झाला होता. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह काही नागरिकांनी तातडीने मदत करून रुग्णांना रुग्णालयात दाखल केले. दोन जण गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे रात्री रवाना करण्यात आले आहे. तर चार जणांवर चाळीसगाव सरकारी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळे रवाना केले असले तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गाडीतील सर्वच्या सर्व मजूर गंभीर जखमी झाले, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. कमलेश हरी काटे, बापू सुभाष पाटील, शेखर राजेंद्र तडवी, अनिस तडवी, शाहरुख तडवी, चंदन हरी काटे, मुक्तार तडवी, दिलीप तडवी, विकास तडवी, सचिन तडवी, नाना प्रभाकर कोळी व इतर प्रवासी वाहनात होते.