नवी दिल्ली : या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आज (4 डिसेंबर) आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका व न्यूझीलंडमध्ये हे दिसेल. भारतात हे ग्रहण पाहता येणार नाही. हे सूर्यग्रहण सकाळी 10:59 वाजता सुरू होईल आणि दुपारी 03:07 पर्यंत चालेल. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होते.
ग्रहण पाहताना कधीही सूर्याकडे थेट पाहू नका. ग्रहण पाहण्यासाठी खास फिल्टर लावलेले चष्मे, पिनहोल कॅमेरा याचा वापर केला जातो. अंटार्क्टिका व्यतिरिक्त हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अटलांटिक देशांतून दिसणार आहे.
सूर्यग्रहण भारतात मात्र दिसणार नाही, तसेच हे सूर्यग्रहण उपछाया ग्रहण असेल, ज्याचा सुतक कालावधी वैध राहणार नाही. त्यामुळे संबंधित गृहीतकेही लागू होणार नाहीत. या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 8 मिनिटांचा असेल, ज्याचा सर्व 12 राशीच्या लोकांवर परिणाम होईल. तथापि, ज्योतिषशास्त्रात काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत, जे केल्याने अशुभ परिणाम टाळता येतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 8 मिनिटांचा असेल, ज्याचा सर्व 12 राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. या काळात वातावरण प्रदुषित होते त्यामुळे या काळात खालेल्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. ही खगोलीय घटना पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. पण या वर्षीचे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.
अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो. म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं. पण हे सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? ग्रहणं तीन प्रकारची असतात. शाळेत याविषयी आपण शिकलो आहोत. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. ग्रहणाच्या स्थितीत सूर्य, चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर किती आहे? ते नेमके सरळ रेषेत आहेत का? आणि तुम्ही पृथ्वीवर नेमके कुठे आहात? या तीन गोष्टींवर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो.
दरम्यान, भारतातून याआधी 15 जानेवारी 2010 रोजी कंकणाकृती ग्रहण दिसलं होतं. दक्षिण भारतातल्या कन्याकुमारीजवळच्या परिसरातून तब्बल सात मिनिटं ग्रहणाची कंकणाकृती स्थिती पाहायला मिळाली होती. तर यानंतरचं कंकणाकृती ग्रहण 21 जून 2020 रोजी उत्तर भारतातून दिसलं पण त्यानंतर पुढची अनेक वर्ष भारतातून कंकणाकृती ग्रहण दिसणार नाही.