नागपूर : शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवावे, असं तोगडिया म्हणाले. तोगडिया यांनी याआधीही अशी मागणी केली होती.
विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक प्रवीण तोगडियांनी बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, महंत अवैद्यनाथ आणि रामचंद्र परमहंस यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. देशात अजून रामराज्य आलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशातील हिंदूंना जोपर्यंत हक्काची घरे मिळणार नाहीत, तोपर्यंत रामराज्य येणार नाही, असंही मत त्यांनी पत्रकार परिषदेमार्फत मांडलं आहे. शौर्य दिनानिमित्त नागूपरमध्ये ते बोलत होते.
प्रवीण तोगडिया हे विश्व हिंदू परिषदेचे नेते होते. मात्र, त्यांचे संघ परिवारातील काही नेत्यांसोबत मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांची विश्व हिंदू परिषदेतून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना केली आहे. आता ते संधी मिळेल तेव्हा भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात.
सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये महाराष्ट्रात चांगलेच आरोप-प्रत्योरोप सुरू आहेत. दोघांमधील युती तुटून पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यामुळे तोगडिया यांनी बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी करून भाजपवर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तोगडिया यांनी यापूर्वीही ही मागणी केली होती. राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्वादी नेते होते. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात त्यांनी उघड भूमिका घेतली होती. राम मंदिर आंदोलनाला त्यांनी नेतृत्व केल्याचे यापूर्वीही तोगडिया यांनी म्हटले आहे. राम मंदिर आंदोलनाचा पाया रचणाऱ्या आणि त्याचे नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी यापूर्वी तोगडिया यांनी केली होती.
प्रवीण तोगडिया हे विश्व हिंदू परिषदेचे नेते होते. मात्र, त्यांचे संघ परिवारातील काही नेत्यांसोबत मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांची विश्व हिंदू परिषदेतून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना केली आहे. आता ते संधी मिळेल तेव्हा भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात.