कोलंबो : श्रीलंकचे अध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांनी सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा मोठा विजय झाल्याची घोषणा केली आहे. निवडणूक निकालानंतर राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांचे भाऊ महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे पंतप्रधान असणार आहेत. नोव्हेंबर 2019 पासूनच ते हंगामी पंतप्रधान आहेत.
निकाल आल्यानंतर महिंदा राजपक्षे यांनी ट्वीट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीतल्या यशाबद्दल फोनवरून अभिनंदन केल्याचं सांगितलं.
श्रीलंकेतल्या सार्वत्रिक निवडणुकीत राजपक्षे बंधुंच्या श्रीलंका पिपल्स फ्रंट पक्षाने दोन-तृतिआंश मतांनी दणदणीत विजय मिळवला. 225 जागांपैकी 145 जागांवर पक्षाला विजय मिळाला तर 5 जागा मित्रपक्षाला मिळाल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीनं शुक्रवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत चांगलाच विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार 225 सदस्यांच्या संसदेत एसएलपीपीने एकट्याने 145 जागा जिंकल्या आणि मित्र पक्षांनी मिळून एकूण 150 जागा जिंकल्या. अशा प्रकारे पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. पक्षाला 68 लाख म्हणजेच 59.9 टक्के मते मिळाली. या जोरदार विजयामुळे पुन्हा एकदा श्रीलंकेत महिंदा राजपक्षे परतणार असल्याचं चित्र समोर आलं आहे.
श्रीलंकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजपक्षे बंधुंचा पुन्हा एकदा दणदणीत विजय झाला. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या जबरदस्त विजयाबद्दल त्यांना अभिनंदन करणारे पहिले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. ते म्हणाले की, दोन्ही बाजू सर्व क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांना पुढे नेण्याचे कार्य करतील आणि विशेष संबंध नवीन उंचावर नेले जातील. ही माहिती देताना राजपक्षे यांनी ट्विट केले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर माझे अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद.” श्रीलंकेच्या जनतेच्या पाठिंब्याने दोन्ही देशांमधील दीर्घकाळ कामकाज सुरू ठेवण्यासाठी तुमच्याबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे. श्रीलंका आणि भारत चांगले मित्र आणि सहयोगी आहेत. ”महिंदा राजपक्षे यांना चीन समर्थक म्हणून ओळखले जात असल्यानं ते भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात.
गेल्या दोन दशकांपासून श्रीलंकेच्या राजकारणावर वादग्रस्त राजपक्षे घराण्याचा पगडा आहे. स्वतः महिंदा राजपक्षे 2005 ते 2015 या काळात पंतप्रधान होते.
या निवडणुकीत माजी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या पक्षाचा दारून पराभव झालं. मागच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 106 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत त्यांना फक्त एक जागा जिंकता आली.
निवडणुकीत रनिल विक्रमसिंघे यांच्या पक्षाची धुळधाण उडाल्यानंतर नव्यानेच राजकारणात प्रवेश केलेला एक गट मुख्य विरोधी पक्ष असणार आहे. श्रीलंकेचे माजी पंतप्रधान रनसिंघे प्रेमादासा यांच्या मुलाने हा पक्ष स्थापन केला आहे. 1993 साली प्रेमादासा यांची हत्या करण्यात आली होती.
राजपक्षे यांच्या विजयानंतर आता पुन्हा एकदा चीनने आपल्या रणनीतीमध्ये यश मिळवले आहे. श्रीलंकेमध्ये 10 वर्षांत पुन्हा एकदा चीननं मजबूत पाया रचला आहे. एक प्रकारे चीन भारताच्या विरोधात दुहेरी भिंत बनवत चालला आहे. डॉ. सिंग यांनी सुचवले आहे की, आता भारताची धोरणे बदलताना आक्रमकतेने काम करावे लागेल.
* 99 वर्षासाठी बंदर चीनला दिले
हंबनटोटा बंदर 99 वर्षं चीनला दिले
आपल्या आधीच्या कार्यकाळात राजपक्षे यांनी चीनबरोबर अनेक करार केले होते, ज्यामुळे भारत आणि पाश्चात्य देशांचा ताण वाढला होता. 2017 मध्ये राजपक्षे यांनी कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यावर रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे हंबनटोटा बंदर चीनला 99 वर्षांसाठी चीनला दिले. हे बंदर भारताच्या अगदी जवळ आहे. राजपक्षे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्यांनी तमीळ बंडखोरांवर निर्दयीपणे अत्याचार केल्याची चर्चा आहे.