चेन्नई : तामिळनाडूमध्ये भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. यामध्ये घटनास्थळावरून 4 जणांचे मृतदेह मिळाल्याची माहिती समोर येत आहे. तर 3 जण जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीडीएस बिपीन रावत जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर (Mi-17V5) आज तामिळनाडूच्या कुन्नूर येथे कोसळले आहे. त्यानंतर तातडीने या प्रकरणी भारतीय वायुसेनेने चौकशीचे आदेश दिले आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते. यात बिपीन रावत, त्यांची पत्नी, डिफेन्स असिस्टंट, सेक्युरिटी कमांडर्स आणि आयएएफ पायलटचा समावेश होता, असे वृत्त समोर येत आहे.
भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर आज तामिळनाडूमध्ये कोसळले आहे. यात जखमी झालेल्या बिपीन रावत यांना येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती दिली आहे. जनरल बिपिन रावत 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख पदावर होते. यानंतर 1 जानेवारी 2020 मध्ये त्यांना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ हे पद देण्यात आले.
The IAF Mi-17V5 helicopter was airborne from Sulur for Wellington. There were 14 persons on board, including the crew: Indian Air Force https://t.co/gmpEuHF1zw
— ANI (@ANI) December 8, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रावत यांच्यासह एकूण 14 जण यात प्रवास करत होते. बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिद्दर, लें. क. हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक. जितेंद्र कुमार, ले. नायक विवेक कुमार, ले. नायक बी. साई तेजा, हवलदार सतपाल अशी प्रवास करणा-याची नावे आहेत.
वृत्तसंस्था एनएनआयच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर सुलूर हवाई तळावरून वेलिंग्टनला जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सध्या घटनास्थळी डॉक्टर, लष्करी अधिकाऱ्यांसह कमांडो उपस्थित आहेत. घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहांची अवस्था अतिशय वाइट होती. ते पूर्णपणे भाजले होते. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्थ झाल्याचे दिसत आहे. क्रॅश होताच हेलिकॉप्टरमध्ये आगीचा भडका उडाला.
रशियन शस्त्रास्त्र पुरवठादार Rosoboronexport च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये कॉकपिट आणि स्वरक्षणार्थ यंत्रणा बसवण्यात आली आहे. हे रॉकेट, तोफ आणि शस्त्र देखील वाहून नेऊ शकते. Mi-17V-5 हे लष्करामधील सर्वात मोठं आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले हेलिकॉप्टर आहे. तसेच हे हेलिकॉप्टर कुठल्याही भौगोलिक स्थिती आणि दिवसा किंवा रात्री अतिशय प्रतिकूल हवामानात चालवता चालवता येतं.