Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोठी गुडन्यूज; राजस्थानमधील सर्व 9 ओमायक्रॉन बाधित निगेटिव्ह
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

मोठी गुडन्यूज; राजस्थानमधील सर्व 9 ओमायक्रॉन बाधित निगेटिव्ह

Surajya Digital
Last updated: 2021/12/10 at 11:26 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

जयपूर : देशासाठी मोठी गुडन्यूज आहे. ती म्हणजे राजस्थानमधील जयपूरमध्ये सापडलेले ओमायक्रॉनचे 9 रूग्ण बरे झाले आहेत. या सर्व रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राजस्थानच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांना आरयूएचएस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासोबतच त्यांना सात दिवस विलगीकरणामध्ये राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे.

5 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये नऊ जणांना कोरोना विषाणूच्या ‘ओमायक्रॉन’ या नवीन प्रकाराची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. यापैकी चार जण दक्षिण आफ्रिकेतून परतले होते आणि पाचजण त्यांच्या संपर्कात आलेले नातेवाईक होते.

ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण 2 डिसेंबरला कर्नाटकात सापडला होता. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 23 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांची संख्या सर्वाधिक 10 आहे. जागतिक स्तरावर, ओमायक्रॉन व्हेरियंटचे 2, 303 रुग्ण सापडले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ”दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या कुटुंबासह त्यांच्या संपर्कात आलेल्या 34 लोकांचे नमुने घेण्यात आले, त्यापैकी नऊ जणांना ओमाक्रॉनची लागण झाली, तर 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.” ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण 2 डिसेंबरला कर्नाटकात सापडला होता.

देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 23 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांची संख्या सर्वाधिक 10 आहे. जागतिक स्तरावर, ओमायक्रॉन व्हेरियंटचे 2, 303 रुग्ण सापडले आहेत.

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे 131 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल (गुरुवारी) 74 लाख 57 हजार 970 डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत लसीचे 131 कोटी 18 लाख 87 हजार 257 डोस देण्यात आले आहेत.

राज्यात काल (गुरुवारी) 789 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 585 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 66 लाख 41 हजार 677 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे. काल एकाही ओमायक्रॉन रुग्णाची राज्यात नोंद झाले आहे. राज्यात सध्या 10 ओमायक्रॉन रुग्णांवर उपचार सुरू आहेत

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #Big #goodnews #omicron #inhibited #negatives #Rajasthan, #मोठी #गुडन्यूज #राजस्थान #ओमायक्रॉन #निगेटिव्ह
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 जानेवारीपर्यंत बंदच राहणार
Next Article ‘घटस्फोट झाला म्हणून महिलांनी मरायचं का?’, अभिनेत्री काम्या भडकली

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?