Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बापरे – दहा हजार रूपये लिटर गाढविणीचं दूध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

बापरे – दहा हजार रूपये लिटर गाढविणीचं दूध

Surajya Digital
Last updated: 2021/12/10 at 4:44 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

हिंगोली : महाराष्ट्रातील हिंगोलीमध्ये गाढवाच्या दुधाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. विशेष म्हणजे हे दूध १० हजार रूपये लीटरने विकले जात आहे. तर एक चमचा दुधासाठी १०० रूपये मोजले जात आहेत. तसेच हे दुध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईतही हे दूध खूप प्रभावी आहे, असा दावा केला जात आहे. परंतु अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असा डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं आवाहन करण्यात येत आहे.

सोशल मीडियाच्या जमान्यात एखाद्या गोष्टीला रातोरात मोठी अमाप प्रसिद्धी मिळते. त्यासाठी लोक पैसे हातात घेऊन रांगाही लावतील. असाच काहीसा प्रकार हिंगोलीत घडलाय. हिंगोलीमध्ये गाढविणीचं दूध घेणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. मराठवाड्यातील जिल्ह्याचे शहर असलेल्या हिंगोलीमध्ये गाढवाचे दूध तब्बल दहा हजार रुपये लिटर विकले जाऊ लागले आहे आणि एवढे महागडे दूध घेण्यासाठी लोक रांगा लावत आहेत.

हिंगोलीत गाढवाच्या दुधाची गल्लीबोळात विक्री सुरू असून चमचाभर दूध प्या आणि सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळवा असा आवाज उठवला जात आहे. हे चमत्कारिक दूध असून हे पिण्याचे अनेक फायदे आहेत. मुलांना न्यूमोनिया होत नाही. याशिवाय ताप, खोकला, कफ यासारख्या आजारांच्या कोरोना रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम गाढविणीचं दूध करते, असा दावा दूध विक्रेते करत आहेत.

गाढवाचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कोरोनापासून बचाव होतो, असा प्रचार सोशल मीडियावर झाला आणि गाढवाचे हे दूध घेण्यासाठी लोक गर्दी करू लागले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रांगा लावून गाढवाचे दूध खरेदी करू लागले. त्यामुळे झाले असे की सुरूवातीला अत्यंत कमी असलेल्या गाढवाच्या दूधाचा भाव रातोरात दहा हजार रुपये लिटरवर गेला. तरीही मोठ्या प्रमाणावर लोक या दूधाची खरेदी करत आहेत.

हिंगोलीमध्ये अनेक जण रस्त्यावर फिरून गाढवाच्या दूधाची विक्री करत आहेत. एक चमचा गाढवाचे दूध प्या आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळवा, अशी हाळी देत हे दूध विक्रेते रस्तोरस्ती फिरताना दिसत आहेत. गाढवाचे एक चमचा दूध मुलांना पाजले तर त्याला न्यूमोनिया होत नाही. सर्दी, ताप आदी आजारांपासूनही संरक्षण मिळते. एवढेच काय मद्यपान करून खंगलेल्यांचीही रोगप्रतिकारशक्ती भक्कम होते, असे दावे हे दूध विक्रेते करू लागल्यामुळे गाढवाचे दूध चांगलाच भाव खाऊन गेले आहे.

गाढवाच्या एक लिटर दूधाला दहा हजार रुपये मोजणे प्रत्येकाच्याच आवक्यात नाही. बहुतांश जणांना एवढी मोठी रक्कम मोजणे अशक्य असल्यामुळे दूध विक्रेत्यांनी त्यावरही उपाय शोधला आहे. त्यांनी चमचाने गाढवाचे दूध विकण्यास सुरूवात केली आहे. एक चमचा दूधासाठी तब्बल १०० रुपये मोजावे लागत आहेत.

गाढवाच्या दूधामुळे कोरोनापासून बचाव होतो, हा दावा डॉक्टरांना मात्र मान्य नाही. जर एखाद्याला कोरोनाची लागण झाली असेल तर त्याने तत्काळ वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावेत. गाढवाचे दूध घेतले म्हणजे आपल्याला काहीही होणार नाही, या भ्रमात राहणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #Bapare #Hingoli #donkey's #milk #tenthousand #rupees, #बापरे #दहाहजार #लिटर #गाढविणी #दूध #हिंगोली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वेळापुरात उद्यापासून राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा 
Next Article भावपूर्ण श्रद्धांजली ! जनरल बिपीन रावत अनंतात विलीन; चार देशाच्या अधिकाऱ्यांची मानवंदना

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?