सोलापूर : जोडभावी पेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईतील तपासात सोलापूर, औरंगाबाद आणि वाशिम जिल्ह्यातील तीन गुन्हे उघडकीस आले असून सुमारे ८ लाख ७० हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत दिवसा व रात्री घरफोडी प्रकार वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त हरीश बैजल, पोलीस उप आयुक्त वैशाली कडुकर व सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडभावी पेठ पोलीस ठाणेचे बाळासाहेब भालचिम व पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.
त्यानुसार गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांच्या पथकाने सराफ बाजार, पूर्व मंगळवार, सोलापुर येथील गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सुरु केला. तपासा दरम्यान आरोपींनी सराफ दुकानात चोरी करण्यासाठी चारचाकी वाहनाचा उपयोग केला असून ते चारचाकी वाहन हे जालना दिशेने गेले असल्याचे समजले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या तपासात हा गुन्हा संजुसिंग कृष्णासिंग भादा, दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक व भारतसिंग कपुरसिंग बावरी (सर्व राहणार गुरुगोविंदसिंग नगर, जि. जालना) या तिघांनी मिळून केले असल्याची माहिती मिळाली. त्याचेकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने व त्याचे दोन साथीदारांच्या मदतीने केले असल्याचे कबुल केले.
आरोपी भारतसिंग बावरी याने व त्याचे दोन साथीदार संजुसिंग कृष्णासिंग भादा, दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक असे मिळुन नमुद चारचाकी वाहनाचा वापर करून वाशिम जिल्ह्यात सराफ बाजारात चोरी केल्याची कबुली दिली आहे.
या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दागिनेपैकी एकुण १० किलो ३४८ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व गुन्हयात वापरलेली चारचाकी मोटारवाहन जप्त करुन एकुण ८ लाख ७० हजार ८८० रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन अद्याप दोन आरोपींचा शोध घेणे सुरु आहे. या तपासादरम्यान सोलापूर, औरंगाबाद व वाशीम जिल्ह्यातील एकुण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे, पोहेकॉ आबा थोरात, महिला पोहेका सरोज शिंदे, पोना सुरेश जमादार, पोना अतुल गवळी, पोना आय्याज बागलकोटे, पोकॉ सोमनाथ थिटे, पोकॉ राजेश घोडके, पोकॉ बाळ माने यांनी केली.