सोलापूर : सोलापूर शहरात आज शुक्रवारी आलेल्या अहवालात कोरोनाचे 43 रुग्ण आढळून आले आहेत. चार मृत्यू तर कोरोनावर तब्बल 189 जणांनी मात केली आहे. त्यामध्ये 115 पुरूष आणि 74 महिला रूग्णांचा समावेश आहे.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 5 हजार 334 संख्या झाली असून त्यामध्ये पुरुष 3 हजार 106 तर महिला 2 हजार 228 रुग्णांचा समावेश आहे. चार बळी गेले आहेत. सिव्हिल आणि अश्विनी हॉस्पिटलमधील प्रत्येकी दोन पुरुष रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 373 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 248 तर महिला 125 रुग्णांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शुक्रवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 684 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 641 अहवाल निगेटिव्ह तर 43 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 37 हजार 978 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 32 हजार 377 आहे. तर 5 हजार 334 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1हजार 231 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 3 हजार 730 आहे.