सोलापूर : बार्शी – कुर्डुवाडी रोडवर ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा अपघात झाला आहे. यामध्ये 2 ठार तर 10 जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटे 4 च्या वाजताच्या सुमारास घडला आहे. या अपघातामध्ये बसच्या पुढच्या भागाचा चुरडा झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी – कुर्डुवाडी रोडवर तिरकस पुलाजवल ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून दहा जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडला. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सिद्धार्थ अनिल शिंदे (ट्रॅव्हल चालक वय 27 रा. वसवडी जि.लातूर), मनोज शिवाजी विद्याधर (रा. बोधनगर लातूर) अशी अपघातात जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत.
पुणे येथून लातूरला जाण्यासाठी खासगी बस प्रवासी घेऊन निघाली होती. यावेळी ट्रॅक्टर ऊसाच्या दोन ट्रॉली घेऊन नांदणी या गावाकडून विठ्ठल शुगर कार्पोरेशन या साखर कारखान्याकडे जात होता. दरम्यान दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये खासगी बसचा चालक सिद्धार्थ शिंदे व त्याचे शेजारी बसलेले मनोज विद्याधर यांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रॅक्टर चालक औदुंबर कोंढारे याच्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रहमतअलि सादिकअलि सय्यद (वय 29), वसंत तुकाराम पाडोळे (वय 65), विठ्ठल नामदेव पांचाळ (वय 91), नेहा विजय सावळे(वय 52), पार्वती बाबूराव बचुटे(वय 49), अश्विनी राहूल कदम(वय 26), मनिषा बाळासाहेब नलावडे(वय 27), पुजा ज्ञानेश्वर बारोले(वय 38), कालिदास निरु चव्हाण(वय 26 सर्व रा.लातूर) विजया किसन पांचाळ (वय 47 रा.पुणे), हेमचंद्र दौलत मोरे(वय 40 रा.बारामती), दत्ता रवन कांबळे(वय 28 रा.बाभळगांव ता.कळंब) अशी जखमींची नावे आहेत.
* तेरामैल अपघातातील आणखी दोघींचा मृत्यू
सोलापूर : दक्षिण सोलापूर येथील बसवनगर ते वडकबाळ दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर चौधरी हॉस्पिटलजवळ झालेल्या भीषण अपघातात आज आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तीनवर गेला आहे.
टमटम व कारच्या जोरदार धडकेने मरीआईवाले कुटुंबातील 14 जणातील एक महिला घटनास्थळीच ठार झाली होती. मंद्रुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून अपघातग्रस्तांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले होते.तानु संजय मरीआईवाले (वय 35) या महिलेचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर डोक्यास गंभीर दुखापत झालेल्या जयश्री संजय मरीआईवाले या अठरा वर्षाच्या मुलीने सायंकाळी पाच वाजता अखेरचा श्वास घेतला.
शुक्रवारी अर्चना दशरथ मरीआईवाले (वय 23) या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेने दक्षिण सोलापूर व मंद्रुप परिसरावर दु:खाचे सावट पसरले आहे. मंद्रुप येथील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या या मरीआईवाले कुटुंबातील व्यक्ती रोजच्या दिनक्रमानुसार आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भिक्षू मागून संध्याकाळी परत मंद्रुपच्या दिशेने जाणाऱ्या या नागरिकांना या भीषण अपघातामुळे आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या जीवाला मुकावे लागले. यामध्ये काही अपघातग्रस्त गंभीर स्वरुपात जखमी झाल्यामुळे मरीआईवाले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.