सोलापूर – शेळगी येथील दहिटणे रस्त्यावर असलेल्या एका घाण पाण्याचा नाल्यात नवजात अर्भक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच दत्त चौकातून दोन मुलांच अपहरण झाल्याच्या घटनेची नोंद झाली आहे.
आज मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घाण पाण्याच्या नाल्याजवळ एक स्त्री जातीचे नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळले. याची माहिती कळविल्यानंतर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील हवालदार दुधाळ यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवून दिले. या घटनेची नोंद जोडभावीपेठ पोलिसात झाली आहे.
अंत्रोळीकर शॉपिंग सेंटर फुटपाथवर प्लास्टीक साहित्याच दुकान लावणाऱ्या सागर महेश यांच्या दोन मुलांच अज्ञात इसमाने अपहरण केल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलीसात दाखल झाली आहे. हा प्रकार रविवारी दुपारी घडला आहे.
दत्तमंदीर, पाणीवेस येथे राहणारे सागर यांच्या फिर्यादीनुसार यांचे प्लास्टीक साहित्याचं दुकान ते फुटपाथवर लावत असताना त्यांच्या ५ वर्षाच्या मुलास तसेच २ वर्षाच्या मुलीस अज्ञात इसमानं फुस लावून पळवून नेलं आहे. या प्रकरणी स.पो.नि. गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
* जाधववाडीत विवाहितेची विष पिऊन आत्महत्या
सोलापूर – जाधववाडी (ता. पंढरपूर) येथे राहणाऱ्या मनीषा तुकाराम भोसले (वय ३०) या विवाहितेने विष पिऊन आत्महत्या केली. काल सोमवारी सकाळच्या सुमारास तिने राहत्या घरात विष प्राशन केली होती. तिला करकंब येथे प्राथमिक उपचार करून आज मंगळवारी पहाटे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ती उपचारापूर्वीच मयत झाली. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली. यामागचे कारण मात्र समजले नाही.
* यावलीत कुर्हाडीने मारहाण, तरुण गंभीर
सोलापूर – यावली (ता. मोहोळ) येथील गावात शेतीच्या वादातून कुऱ्हाड आणि काठीने केलेल्या मारहाणीत आकाश मधुकर पाटील (वय २४) हा गंभीर जखमी झाला. ही घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनील अनिल पाटील आणि अन्य दोघांनी मारहाण केली. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* वाघोलीत मारहाण, पती पत्नी जखमी
सोलापूर – वाघोली तालुका मोहोळ येथे मागील भांडणाच्या कारणावरून तीक्ष्ण शस्त्राने केलेल्या मारहाणीत अशोक चंद्रकांत जाधव (वय५०)आणि त्यांची पत्नी सविता (वय ४८) हे दोघे जखमी झाले. ही घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना गणेश दामू उघडे याने मारहाण केली अशी नोंद पोलिसात झाली आहे.
* मानसिक आजारातून विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या