अकलूज : माळशिरस तालुक्यात गुरुवारी ६ अॉगस्टला दिवसभरात ६६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आजपर्यंतच्या दैनंदिन संख्येत ही सर्वाधिक वाढ झाली आहे.
तालुक्यात अकलूज येथील ६५ वर्षीय व्यक्ती व लवंग येथील ७२ वर्षांच्या व्यक्तीचे उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तालुक्यातील मृताची संख्या ५ वर पोहचली आहे.
माळशिरस तालुक्यात गुरुवारी ६ अॉगस्टाच्या दिवसभरात माळशिरस तालुक्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्हा आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार माळशिरस तालुक्यातील अकलूज मध्ये ३ पुरुष व ६ महिला असे एकूण ९, बोरगांव येथे ७ पुरुष व २ स्त्री एकूण ९,गिरझणी येथे १ पुरुष,कन्हेर येथे १ पुरुष,लवंग येथे १ पुरुष,महाळुंग मध्ये १० पुरुष ३ स्त्री एकूण १३,माळीनगर १ पुरुष,माळखांबी मध्ये २ पुरुष,३ स्त्री एकुण ५, नेवरे येथे ३ पुरुष २ स्त्री एकुण ५,संगम १ पुरुष,सवतगाव ४ पुरुष ३ स्त्री एकूण ७,शिंदेवाडी १ पुरुष ,वेळापुर १ पुरुष ८ स्त्री एकूण ९,विझोरी मध्ये १ स्त्री ,वाफेगाव मध्ये १ पुरुष १ स्त्री असे तालुक्यात ६६ कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माळशिरस तालुक्यातील आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अकलूज येथील ६५ वर्षीय पुरुषांवर राणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. सदर व्यक्तींचा ७ आगस्ट रोजी पाहटे मृत्यू झाला. लवंग येथील ७२ वर्षाच्या पुरुषांवर अकलाई क्रिटीकल हॉस्पिटल अकलूज येथे उपचार सुरु होते. सदर व्यक्ती ५ अॉगस्ट दुपारी मृत पावला आहे वरील दोन्ही मृत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होते.
तालुक्याची एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ३५९ इतकी झाली असून,आतापार्यत १३७ रुग्णं उपचार घेवून घरी परतले आहेत तर २१७ रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात आतापर्यत एकूण ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.