Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रंगरंगोटीसह शाळेच्या सुधारणासाठी शिक्षकाने मोडली एक लाखाची ठेव 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

रंगरंगोटीसह शाळेच्या सुधारणासाठी शिक्षकाने मोडली एक लाखाची ठेव 

Surajya Digital
Last updated: 2021/12/16 at 6:23 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

भंडारकवठे (नितिन वारे ) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील रहिवासी व कुसूर येथे जिल्हा परिषद मुख्याध्यापक म्हणून रुजू असलेले निलेश नंदर्गी यांनी आपली स्वकमाईने बँकेत ठेवलेली १ लाख रुपये असलेली ठेव मोडून कुसूरच्या जिल्हा परिषद शाळेच्या रंगरंगोटी व शाळा सुधारणा करण्यासाठी दिली आहे.

आज जग एकविसाव्या शतकाकडे जात असताना शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे. मात्र याउलट पालकांना सुध्दा हेवा वाटावा असा एक मुख्याध्यापक भंडारकवठे येथे पाहावयास मिळत आहे. यांचे कौतुक होत आहे. विद्येच्या मंदिरासाठी त्यांनी आपली कष्टाची पुंजी (ठेव) मोडून दिली आहे. त्यांनी आपलं संसार संभाळून ‘शाळा हे आपलं कुटुंब’ आहे असं समजून  काम करत आहेत. भंडारकवठ्याचे व कुसूरचे मुख्याध्यापक निलेश नंदर्गी यांनी मुलगा- नवरा- वडील – शिक्षक व मुख्याध्यापक या भूमिकेतून नवा आदर्श सगळ्याचा डोळ्यांपुढे ठेवला आहे.

भंडारकवठे येथील रहिवासी व कुसुर येथे जिल्हा परिषद मुख्याध्यापक म्हणून रुजू असलेले नीलेश नंदर्गी यांनी कुसूरच्या जिल्हा परिषद शाळेच्या रंगरंगोटी व शाळा  सुधारणा करण्यासाठी त्यांनी आपली जिल्हा मध्यवर्ती बँकेत १ लाख रुपये असलेली ठेव मोडून दिली शाळेला दिली आहे.

‘सुराज्य डिजिटल’शी बोलताना मुख्याध्यापक नीलेश नंदर्गी म्हणाले, की आपण गेली ३३ वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करीत असताना अक्कलकोट, मंद्रूप, तेलगाव, मंगळवेढा इत्यादी ठिकाणी नोकरी केली. घरसंसाराचा गाडा चालवत थोड्या प्रमाणात मुला व मुलींच्या शिक्षणासाठी व विवाहासाठी आर्थिक जुळवाजुळव केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुलीच्या लग्नासाठी ७ लाख रुपये ठेव ठेवली होती.  मुलीचा  लग्न हे फक्त ६ लाखात झाले व उर्वरित १ लाख रुपये शिल्लक राहिले होते. १ लाख रुपये  सामाजिक कामासाठी वापर व्हावे अशी भावना मनात होती.

अनेक दिवसापासून ही इच्छा मनात होती. माझी एकत्र कुटुंब पद्धती असल्यानेही पत्नी,आई,मुलगा,व भावाची  विधवा पत्नी याच्या संमतीने हा निर्णय घेतला. त्याच बरोबर भंडारकवठे येथील ग्रामदैवत शिवयोगी महासिध्द देवालयात दर अमावसेला परगावाचे दर्शनाला आलेल्या भाविकांना  महाप्रसादाचे आयोजनही केलं जातं. या वेळी असंख्य भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात, अशी अनेक सामाजिक कार्य मी माझे जीवन असेपर्यंत करत राहणार यात माझ्या पत्नीचा व माझ्या संपूर्ण कुटुंबाचा सिंहासा वाटा असल्याचेही सांगितलं.

अनेक तालुक्यात काम करत असताना  गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय जीवनात आलेल्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. माझे आदर्श  कै. दीनानाथ कमळे गुरुजी यांनी  मला जी शिकवण दिली तीच शिकवण मी पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे कै. दीनानाथ कमळे गुरुजी यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील आर्थिक दुर्बल व मागास समाजात शिक्षणापासून वंचित राहता कामा नये  यासाठी त्यांनी शिक्षण संस्था काढल्या व मोफत शिक्षण दिले, त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. त्यातूनच ही रक्कम शाळेसाठी देण्याची कल्पना सुचली. निलेश नंदर्गी यांनी केलेले कामाचे कौतूक संपूर्ण तालुक्यात होत आहे.

जिल्हा परिषद शिक्षक  नागनाथ कोळी, शिवाजी नकाते, अण्णाराव पाटील, अश्विनी कुलकर्णी, शिवानंद माशाळे, वृध्दयना खडाखडे, शमशादबेगम मुल्ला,मुनीर बारुदवाले, रावसाहेब गिडगोंडे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #teacher #broke #deposit #onelakh #improvement #school #colors, #रंगरंगोटी #शाळा #सुधारणा #शिक्षक #मोडली #एकलाख #ठेव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शहरात चार चोऱ्या, मार्डीच्या युवकास पकडले; तर सोलापुरात गर्दी केल्याने ३८ जणांवर गुन्हे दाखल
Next Article लातूर विभागाच्या उस्मानाबादला विजेतेपद; खेलो इंडिया राज्य खो खो स्पर्धा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?