Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मनसेच्या रुपाली पाटील – ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मनसेच्या रुपाली पाटील – ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

Surajya Digital
Last updated: 2021/12/16 at 9:33 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्या. मी ज्या पद्धतीने आधी लोकांसाठी काम करत होते, त्याच पद्धतीने मी राष्ट्रवादीत आल्यानंतरही लोकांसाठी काम करेन, असं त्या यावेळी म्हणाल्या.

मनसेच्या अंतर्गत राजकारणाला वैतागून महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नुकतेच पक्षाला रामराम केला. यानंतर ठोंबरेंनी आज गुरूवारी (१६ डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या उपस्थिती रुपाली पाटील ठोंबरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ठोंबरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश सोहळा हा राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयात झाला.

“रुपाली ताईंना माननारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे लोक त्यांना मानतात. त्यांच्यामुळे पुणे शहर पुढे जाईल, महिलांचा विकास होईल,” असं अजित पवार यावेळी म्हणाले. रुपाली ठोंबरे आणि इतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं अजित पवारांनी राष्ट्रवादीत स्वागत केलं. राष्ट्रवादीतले नेते सर्व महिला पदाधिकाऱ्यांना स्वतःच्या बहिणीप्रमाणे मदत करतील, असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रुपाली ठोंबरेंनी ट्वीट करत पक्षा प्रवेशाचे संकेत दिले होते. ठोंबरेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, ‘आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार…’

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अजित पवारांनी दिलेल्या हिमतीमुळे मला राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली, असं त्यांनी सांगितलं. “मनसेत असताना सतत पालकमंत्री अजित पवारांची भेट का घेते, अशी विचारणा व्हायची. पालकमंत्री म्हणून अजित पवार खूप चांगलं काम करत आहेत. मी ज्या कामांसाठी आतापर्यंत अजित पवारांची भेट घेतली, ती सर्व कामे त्यांनी कायदेशीररित्या पूर्ण केली,” असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या. माझ्याच पूर्वीच्या पक्षातील काही लोकांना मला राष्ट्रवादीत पाठवायचे होते, असं रुपाली ठोंबरे यांनी यावेळी सांगितलंय .

रूपाली पाटील ठोबरेंनी मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. परंतु पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी त्यांना उमेदवारी देखील दिली होती. मात्र, रुपाली ठोबरेंनी मंगळवारी (१४ डिसेंबर) मनसेला सोडचिठ्ठी दिली.

* थोडक्यात परिचय

रुपाली पाटील ठोंबरे… पेशानं वकील… कुटुंबातूनच त्यांना या क्षेत्राचा वारसा मिळाला. मुळ मराठवाड्यातले असलेले त्यांचे वडील आणि काका सुद्धा वकील होते. आज राजकारणाचं मैदान गाजवणाऱ्या रुपाली पाटील महाविद्यालयीन काळात खेळाचं मैदान गाजवत होत्या. त्यांना व्हॉलीबॉल आणि रायफल शुटिंगची आवड होती. २०१२ ला त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी पुणे महानगर पालिकेत चांगली कामगिरी केली.

रुपाली यांच्या लग्नाचा किस्साही भारी आहे. वकीलीचं शिक्षण घेणाऱ्या रुपाली आणि कोर्टात काम करणाऱ्या एका तरुणाचं सुत जुळलं. काम करता करता दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे याच तरुणासोबत म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध वकील विजयसिंह ठोंबरे यांच्याशी त्यांचं लव्ह कम अरेंज मॅरेज झालं.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #MNS's #RupaliPatil #Thombre #joins #NCP, #मनसे #रुपालीपाटीलठोंबरे #राष्ट्रवादी #प्रवेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सरपंच परिषदेच्या विरोधामुळे सरपंच अपात्रतेची कारवाई बारगळली
Next Article नजिक पिंपरीत रोखलेला बाल विवाह गुपचुप केला पुन्हा; झाली सात महिन्यांची गरोदर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?