Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नजिक पिंपरीत रोखलेला बाल विवाह गुपचुप केला पुन्हा; झाली सात महिन्यांची गरोदर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

नजिक पिंपरीत रोखलेला बाल विवाह गुपचुप केला पुन्हा; झाली सात महिन्यांची गरोदर

Surajya Digital
Last updated: 2021/12/16 at 10:21 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मोहोळ : १४  वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीबरोबर दीड वर्षापूर्वी झालेला बालविवाह रोखून संबंधित नातेवाईकांवर गुन्हा दाखल करून समज देऊन सोडून दिल्यानंतर पुन्हा त्याच  मुलीबरोबर गुपचूप बालविवाह करून ती मुलगी सात महिन्यांची गरोदर राहील्याची घटना उघडकीस आलीय.

घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा बाल विकास कार्यालयामार्फत चौकशी करून संबंधित पतीसह अन्य तिघांवर  मोहोळ पोलिस ठाण्यात बाल लैंगिक संरक्षण कायदा अधिनियमानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ही खळबळजनक घटना मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील नजीक पिंपरी येथे १५ जून २०२०  रोजी नजिक पिंपरी येथील सागर महादेव मेटकरी या मुलाचा विवाह एका १४ वर्षाच्या मुलीबरोबर होत असल्याची तक्रार जिल्हा बाल विकास अधिकारी अतुल वाघमारे यांना मिळाली होती. त्यानुसार १५ जून २०२०  रोजी नजीक पिंपरी येथे जिल्हा बाल विकास अधिकारी यांच्या पथकाने भेट देत तो बालविवाह रोखला होता.

त्या दिवशी संबंधित सागर महादेव मेटकरी व त्याच्या नातेवाईकांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांचे समुपदेशन करून त्यांना सोडून दिले होते. दरम्यान पुन्हा सागर महादेव मेटकरी याचा विवाह त्याच मुलीशी गुपचूप लग्न लावून देण्यात आला आला. दरम्यान ती पीडित मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याची निनावी तक्रार जिल्हा बाल विकास अधिकारी कार्यालयास प्राप्त झाली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर अतुल वाघमारे यांच्या पथकाने नजीक पिंपरी येथे भेट देऊन त्या मुलीचा पुन्हा विवाह झाला असून ती मुलगी गरोदर झाल्याचे निदर्शनास आले. ज्या दवाखान्यामध्ये तिने उपचार घेतले तेथील सोनोग्राफी केलेले सर्व रिपोर्ट जमा केले.

यावरून मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये सागर मेटकरी, त्याची आई संगीता मेटकरी, पीडित मुलीचे वाडील नामदेव वाघमोडे व मुलीची आई श्रीदेवी वाघमोडे या चौघा जणांचा विरोधात बाललैंगिक संरक्षण कायद्यानुसार  बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने हे करीत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* सव्वा लाखाचे दागिने चोरल्याप्रकरणी पती, दीर, सासर्‍याविरोधात गुन्हा दाखल

बार्शी : विवाहावेळी वडिलांनी केलेल्या सव्वा लाख रुपये किंमतीच्या पाटल्या चोरल्याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन तिचे पती नंदकुमार गोविंद शिदे, सासरे गोविंद जोतीराम शिंदे, सासु छाया गोविंद शिंदे, दिर राहुल गोविंद  शिंदे ( रा. चव्हाण प्लॉट, उपळाई रस्ता, बार्शी ) यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सौ. अपर्णा नंदकुमार शिंदे (रा. हल्ली भरतपुर, लातुर रस्ता, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान या अजब फिर्यादी मुळे पोलिसही चक्रावले आहेत.  फिर्यादीचे लग्न  29 नोव्हेंबर  2017 साली नंदकुमार शिंदे यांचे बरोबर झालेले आहे. लग्नात त्यांना स्त्रीधन म्हणुन वडिलांनी गळयातील दीड तोळ्याचे मिनी गंठन, दीड तोळ्याचे कानातील वेल, साडेतीन तोळयाच्या पाटल्या व एक तोळयाचा नेकलेस असे सोन्याचे दागीने घातलेले होते.
नोव्हेंबर 2021 मध्ये  जाऊ रूपाली राहुल शिंदे ही प्रसूतीसाठी बार्शी येथे आलेली होती. तिला दवाखान्यात डबा देण्यासाठी त्या रात्री  जात असताना पतीने तु दवाखान्यात पाटल्या घालुन कशाला जातेस? रात्रीची वेळ आहे, तुला मुक्कामी थांबायचे आहे. त्यामुळे तु पाटल्या काढुन ठेव असे सांगीतल्याने त्यांनी हातातील दोन पाटल्या काढुन पतीकडे दिल्या. त्यानंतर दिवाळी मध्ये त्यांना माहेरी जाता आले नाही.
त्यामुळे  3 डिसेंबर 2021  रोजी त्या माहेरी जाण्यासाठी निघाल्या असता त्यांनी पतीस पाटल्याबाबत विचारणा केली. त्यांनी कपाटामध्ये ठेवल्या आहेत, असे सांगितले. मात्र तिथे त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी सर्वत्र शोधल्या असता त्या कुठेच मिळाल्या नाहीत. त्या तशाच माहेरी गेल्या. तिथून त्यांनी पतीला अनेकवेळा फोन केला मात्र त्यांनी उचलला नाही. त्यामुळे त्यांची खात्री झाली की पाटल्या पती, सासु, सासरे, दिर यांनीच संगनमत करून  चोरलेल्या आहेत.

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #नजिकपिंपरी #रोखलेला #बालविवाह #गुपचुप #सातमहिन्यांची #गरोदर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मनसेच्या रुपाली पाटील – ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
Next Article ‘शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही’

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?