बंगळूरू : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी धक्कादायक विधान केलंय. त्यामुळे शिवप्रेमी अधिकच संतापले आहेत. महाराष्ट्रभरातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे. ‘छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे आहे, असं ते म्हणाले.
कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावरून शिवप्रेमी संतापले आहेत. कोल्हापुरात सध्या तणावाचे वातावरण आहे. तर बेळगावात अनेकजण आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवप्रेमींनी कानडी व्यवसायिकांना दुकानं बंद करायला भाग पाडले आहे. शिवप्रेमींकडून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात येत आहे.
या वादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत, छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, अशा अर्थाचं विधान केल्यानं हा वाद आता आणखी ताणला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान कर्नाटकातील पोलिसांना या संपूर्ण घटनेप्रकरणी कायद्याचं उल्लंघन करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्याचप्रमाणे गृहमंत्र्यांना या घटनेकडे लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत.
बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर या घटनेच्या विरोधात बेळगावात ठिकठिकाणी शिवप्रेमींनी दगडफेक केल्याच्या घटना घडल्यात. यामुळे बेळगावात बंद सदृष्य वातावरण आहे. महाराष्ट्रभरातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रातोरात महाराष्ट्र एकीकरण समितीनं जे केलं, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेलं, तर कारवाई ही होणारचं. गृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचं नुकसान सहन केलं जाणार नाही.
कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल झाला होता. विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सुरुवात केली होती. बंगळुरुतील एक चौकातील हा पुतळा असून, त्याची गुरुवारी रात्री विटंबना करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. या घटनेचा व्हिडीओ तयार करुन तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर ही घटना समोर आली आणि चौफेर या घटनेबाबत तीव्र पडसाद उमटू लागले.
* सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे एकनाथ शिंदे
– कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो.
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे, असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. तसेच बंगलोरमधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल-पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं, असंही ते म्हणाले.