सोलापूर : कर्नाटकात बंगळूरात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञात इसमांनी विटंबना केली. याच्या निषेधार्थ आज सोलापुरात शिवप्रेमींनी कर्नाटकच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तर कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, एसटी. बस स्थानकाजवळील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ सोलापूरातील शिवप्रेमींनी एकत्र येवून शिवपुतळ्यास अभिवादन केले. नंतर शिवरायांच्या विजयाच्या घोषणा देत कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते.
कर्नाटकातील बंगळरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची विटंबना विटंबना केल्यानंतर सीमाभागासह महाराष्ट्रासह सोलापुरातही पडसाद उमटले. शिवप्रेमी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती पुतळा येथे जमून कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी पोलीसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बंगळूरू येथे शिवाजीराजांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. दरम्यान राज्यभरातून नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेनंतर बेळगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करत जमलेल्या शिवप्रेमींनी प्रशासनाकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्रिट करत संताप व्यक्त केला आहे. ते म्हणतात, संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. खा. संजय राऊत यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.
* संभाजी ब्रिगेडने केला पुतळा जाळण्याचा प्रयत्न
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. वाद सीमा प्रश्नाचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही. त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या कर्नाटकी शिव द्रोही संघटनावर कठोर शासन झाले पाहिजे अन्यथा यांचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आला आहे.
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बोंमया यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची पुतळ्याची विटंबना झाली तो विषय किरकोळ आहे , अशी मुक्ताफळे उधळली. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर भागात त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आला.
* पुतळा जाळण्याचा प्रयत्नासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
यावेळी पोलिसांनी पुतळा ताब्यात घेऊन संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपशहरप्रमुख सीताराम बाबर, उपाध्यक्ष नागेश पवार, संपर्कप्रमुख दत्ता जाधव, संघटक विनायक भोसले, सिद्धाराम सुतार यांना ताब्यात घेऊन सोडून दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.