Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरच्या न्यायाधीश,एसपीच्या बनावट फेसबुक अकाउंटद्वारे पैशाची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूरच्या न्यायाधीश,एसपीच्या बनावट फेसबुक अकाउंटद्वारे पैशाची मागणी

Surajya Digital
Last updated: 2021/12/19 at 12:45 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : न्यायदंडाधिकारी पोलीस व अधीक्षकांचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्यावरुन पैशाची मागणी करणाऱ्या दोघांना राजस्थान व उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे.

मोनुकुमार नथुसिंग पाल ( वय २६, रा. मेरठ, उत्तरप्रदेश) व देवकरण हनुमानसिंग रावत ( वय – २४, रा. अजमेर, राजस्थान) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मागील काही महिन्यांपासून फेसबुकवरील प्रोफाइलची कॉपी करून फेक प्रोफाइल बनवून सदरची व्यक्ती ही तीच आहे असे भासवून वेगवेगळ्या अडचणी असल्याची कारणे सांगून तत्काळ सांगून फोनपे, गुगलपेसारख्या ऑनलाइन ॲपव्दारे पैशाची वाढ झाली होती.

जानेवारी २०२१ मध्ये जिल्ह्यातील एका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचे फेसबुकचे बनावट अकाउंट तयार करून त्यांचे मित्र, नातेवाईक व ओळखीच्या लोकांना पैशांची तत्काळ गरज असल्याचे भासवून त्यांना फोनपे गुगलपेचे नंबर देवून त्यावर पैसे पाठविण्याबाबत सांगितले.

त्यातील दोन व्यक्तींनी अनुक्रमे १० हजार रुपये व सात हजार रुपये पाठवून दिले. त्यांची फसवणूक केल्याने माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ऑक्टोबर २०२१ मध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचेही बनावट फेसबुक अकाउंट तयार करून पैसे पाठविण्याबाबत सांगितल्याने अज्ञात इसमाविरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या दोन्ही गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याकडे देण्यात आला होता. सदर दोन्ही गुन्ह्यांचा तांत्रिक तपास व विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढून दोन तपास पथके उत्तरप्रदेश व राजस्थान या ठिकाणी रवाना करण्यात आली होती.

या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची माहिती काढून दोन्ही गुन्ह्यातील प्रत्येकी एक आरोपींना गुन्हा करण्याकरिता वापरलेले मोबाइल फोन तपासकामी जप्त करून जेरबंद करण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक शांताराम शेळके, फौजदार गणेश पिंगुवाले, शैलेश खेडकर, सूरज निंबाळकर आदींनी केली आहे.

 

* फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी 

 

– फेसबुक प्रोफाईलची माहिती व फोटो लॉक करा; अनोळखी व्यक्‍तीची रिक्‍वेस्ट स्वीकारु नका

– फेसबुकवरील मित्र दिसणार नाहीत म्हणून ‘ओन्ली मी’ हा पर्याय निवडावा

– फेसबुकवरून कोणी पैसे मागत असल्यास समोरील व्यक्‍ती तीच आहे का, याची खात्री करा

– बनावट फेसबुक अकाउंट कोणी तयार केल्यास pretending to me हा पर्याय निवडून ते तत्काळ बंद करा

– कोणत्याही व्यक्‍तीला ऍप, फोन, एसएमएसद्वारे बॅंक खात्याची, डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका

– कोणत्याही कंपनी, सर्व्हिसेसची माहिती कस्टमर केअर नंबर, गुगलवर शोधू नका

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Demand #money #through #fake #Facebook #account #Solapur #judge #SP, #सोलापूर #न्यायाधीश #एसपी #बनावट #फेसबुक #अकाउंट #पैशाची #मागणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “अजित पवार स्वतः बेल वर बाहेर, ते उद्या तुरुंगात जातील”
Next Article सोलापुरात थंडी वाढली; तापमान १२.५ अंशांवर; संगमेश्वरमध्ये कला शाखेतील विद्यार्थ्यांची सुसंवाद

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?