Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कर्नाटक सरकारचा निषेध करीत सोलापुरात छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस घातला दुग्धाभिषेक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

कर्नाटक सरकारचा निषेध करीत सोलापुरात छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस घातला दुग्धाभिषेक

Surajya Digital
Last updated: 2021/12/19 at 4:59 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : कर्नाटकातील बंगळंरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची विटंबना केल्याच्या घटनेचे पडसाद सोलापुरातही उमटले आहेत. आज सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास दुग्ध अभिषेक करून कर्नाटक सरकारचा निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवप्रेमींनी एकत्र येऊन कर्नाटक सरकार विरोधी घोषणा दिल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी उपमहापौर पद्माकर काळे, कार्याध्यक्ष संतोष पवार, महिला अध्यक्ष सुनिता रोटे, कार्याध्यक्ष लता ढेरे, सिया मुलांनी, लता फुटाणे, अश्विनी भोसले, राजन जाधव, चंद्रकांत पवार, आनंद मुस्तारे, गफूर शेख, राजू कुरेशी, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निशांत साळवे, शाहरुख हुच्छे, यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिवप्रेमींना ताब्यात घेतले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या बेताल वक्तव्य च्या निषेधार्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच सिंहासनरूढ मूर्तीला गुलाब पाकळ्याने व दुग्धाभिषेक करून श्रीफळ वाढवून आरती केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवराय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, कर्नाटक सरकारचा निषेध असो, कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्याचा निषेध असो, या कर्नाटक सरकारचे करायचे काय? खाली डोके वरती पाय, धिक्कार असो धिक्कार असो – कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री यांचा निषेध असो अशी घोषणा देण्यात आल्या.

सबंध भारतातीलच नव्हे तर जगातील लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानले असून त्यांची बदनामी, विटंबना भाजप प्रणित कर्नाटक राज्यात होते आणि तिथले मुख्यमंत्री त्यावर बेताल वक्तव्य करतात ही बाब अत्यंत निषेधार्थ असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करत असल्याचे सांगितले. सरकारने लवकरात लवकर पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या बेताल या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी केली.

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटक राज्यात झालेल्या विटंबनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आहोत, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान, ऊर्जा स्थान व अस्मिता आहेत. त्यांची बदनामी व विटंबना कदापि सहन करण्यात येणार नाही हे बसवराज बोम्मई कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याने लक्षात ठेवावे, असा इशारा राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, महिला शहराध्यक्ष सुनिता रोटे, ज्येष्ठ नेते पद्माकर नाना काळे, राजन जाधव, लता ढेरे, निशांत साळवे, राजू कुरेशी, मिलिंद गोरे, वसीम बुराण, गफुर शेख, अमीर शेख, प्रकाश जाधव, तन्वीर गुलजार, बसवराज कोळी, शिवराज विभुते, ज्योतिबा गुंड, मनीषा माने, लता फुटाणे, अश्विनी भोसले, रेखाताई सपाटे, शांता शटगार, शहराध्यक्ष भारत जाधव आदींची उपस्थिती होती.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Protesting #Karnataka #government #Chhatrapati #Shivaji #Solapur, #कर्नाटक #सरकार #निषेध #सोलापुरात #घोषणा #संभाजीब्रिगेड #पुतळा #जाळण्याचा #प्रयत्न
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खासदार निंबाळकरांचा ‘मी’ पणा नडला; माढा नगरपंचायतमध्ये भाजपला उमेदवारही मिळाला
Next Article येत्या काही दिवसांत देशात नवीन सहकार धोरण येणार, काँग्रेसने डॉ. आंबेडकरांचा अपमानच केला

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?