मुंबई : पुढील दोन दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. यामुळे थंडी आणखी वाढू शकते. उत्तरेकडील थंड वारे येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. अन्य ठिकाणी ते सरासरीच्या जवळपास आहे.
वायव्य भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पुढील दोन दिवस गुजरात आणि महाराष्ट्रात पारा खालीच राहणार आहे. उद्या 21 डिसेंबरपासून राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वायव्य भारतात सरासरी तापमानात घसरण होत आहे. त्यामुळे राजस्थानात थंडीच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट तर दिल्लीत येलो अलर्ट जारी केला आहे. वायव्य भारतातून थंडीला सुरूवात झाली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सध्या हिमवृष्टी सुरू आहे. तर दिल्ली, पंजाब, राज्यस्थान आणि मध्य प्रदेशात तीव्र थंडीची लाट पसरली आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमान 2 ते 3 अंशानी घटले आहे. पुढील दोन दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात आता आगमन झालेली थंडी पुढील 2 महिने म्हणजे 21 फेब्रुवारी पर्यंत राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे आता थंडीसाठी सज्ज होण्यास नागरिकांनीही सुरूवात केली आहे. येत्या 1-2 दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका पडला आहे त्यामुळे तेथून येणार्या वार्यांमुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस गारवा कायम राहणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नागपूर मध्ये 7.8, अमरावती मध्ये 8 तर पुण्यात 11.2 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आलं आहे. आज दिल्ली मध्ये यंदाची सर्वात थंड सकाळ नोंदवण्यात आली आहे. 4 अंशापेक्षाही कमी तापमान असल्याने आयएमडी कडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भामध्ये आज सकाळी किमान तापमान 4-7 अंशामध्ये नोंदवण्यात आलं आहे. हे सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मुंबई मध्येही अल्हाददायक वातावरण आहे. मुंबई मध्ये रात्रीच्या वेळेस 20 अंशाच्या खाली तापमानाची नोंद होत आहे तर दिवसा 30-31 अंश तापमान राहतं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुका थंडीने गारठला आहे. मिनी महाबळेश्वर म्हणुन ओळख असणाऱ्या दापोलीच्या तापमानाचा पारा 12.7 अंश सेल्सिअस एवढा खाली गेला आहे. यावर्षीच्या तापमानाची सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
* सोलापुरात थंडी वाढली; तापमान १२.५ अंशांवर
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडीचे प्रमाण वाढले असून शनिवारी पारा १२.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून किमान सोलापूरचे तापमान १४.५ अंशांच्या जवळपास असून तापमान कमी झाल्याने आता सोलापूरकरांना हुडहुडी भरत आहे. चार दिवसांपूर्वी किमान तापमान १६.८ अंश नोंदले गेले होते. त्यानंतर शनिवारी मात्र थेट १२.५ अंशांपर्यंत घसरले आहे.
किमान तापमानात ४ ते ५ अंशांची घसरण झाली आहे. किमान आणि कमाल तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे सोलापूर आता गारेगार होत असून, दिवसागणिक यात भरच पडत आहे.
यंदा सर्वत्र पाऊस चांगला झाल्याने थंडीचे प्रमाण देखील वाढणार हे निश्चित होते. त्यानुसार आता थंडीमध्ये वाढ होत असल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यात येत आहेत. थंडीपासून बचावासाठी नागरिक आता गरम कपड्यांचा आधार घेत आहेत. स्वेटर, मफलर, कानटोप्या खरेदी वाढला आहे. करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.